Latest

Sara Lee Death : WWE स्टार ‘सारा ली’ने घेतला अवघ्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE)ची माजी रेसलर सारा ली हिचे निधन झाले आहे (Sara Lee Death). वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. सारा लीच्या मृत्यूची बातमी तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यातून तिला श्रद्धांजली वाहली जात आहे. साराने WWE च्या रिअॅलिटी सीरिज टफ इनफच्या सीझन 6 चे विजेतेपद पटकावले होते.

सारा लीच्या आईने दिली निधनाची माहिती

WWE ची माजी प्रसिद्ध रेसलर सारा लीच्या आईने एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, 'सारा ली हिने अखेरचा श्वास घेतला आहे. खूप जड अंतःकरणाने मी ही बातमी जाहीर करत आहे. अशा परिस्थितीत, या दुःखाच्या वेळी तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबासोबत शोक करावा अशी आमची इच्छा आहे', अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (Sara Lee Death)

निधन कशामुळे झाले?

WWE स्टार साराचे निधन कसे झाले? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साराच्या मृत्यूचे कारण सायनस असल्याचे सांगितले जात आहे. साराला सायनसचा त्रास होता आणि काही दिवसांपासून ती या आजाराने त्रस्त होती. WWE व्यतिरिक्त, अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी साराच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. सारा सुमारे एक वर्ष WWE मध्ये खेळली. या दरम्यान तिने अनेक मोठ्या लढती जिंकल्या. जानेवारी 2016 मध्ये, तिने सहा-महिला टॅग टीम मॅचमधून WWE च्या रिंगमध्ये पदार्पण केले. 2016 च्या शेवटी, साराने तिचा शेवटचा सामना खेळला.

सारा सोशल मीडिया सेन्सेशन होती…

मजबूत रेसलर असण्यासोबतच सारा ली एक सुंदर होती. तिने तिच्या इंस्टाग्रामच्या परिचय रखान्यात माजी NXT/WWE सुपरस्टार लिहिले होते. इन्स्टावर साराचे 103 हजार फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये तिने असेही सांगितले की ती रिअॅलिटी सीरिज टफ इनफ सीझन 6 ची विजेती देखील आहे. सारा लीने माजी WWE रेसलर वेस्टिन ब्लेकला डेट केले. तो 3 मुलांचा पालक आहे. साराने 30 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. त्यानंतर ती मिशिगनमध्ये वास्तव्यास होती. (Sara Lee Death)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT