पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काॅंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय काही नवीन नाही. यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला तेव्हाच चव्हाण पक्ष सोडणार होते, असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज (दि.१३) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut on Ashok Chavan)
खासदार राऊत पुढे म्हणाले, अशोक काँग्रेस म्हणजे काँग्रेस नाही, मुख्यमंत्री शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही. पक्षात व्यक्ती येतात आणि जातात पक्ष तसाच राहतो. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसच विजयी होईल, असा दावा देखील त्यांनी आज केला. (Sanjay Raut on Ashok Chavan)
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आज मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप कार्यालयात आज दुपारी १२ वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अमर राजूरकर हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान, अशोक चव्हाण राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते.