संजय राऊत  
Latest

Sanjay Raut : मी फक्‍त शरद पवारांचे ऐकतो : संजय राऊतांचे अजित पवारांना प्रत्‍युत्तर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार माझ्या विश्‍वसनीयतेपेक्षा शरद पवारांची भूमिका महत्त्वाची. अजित पवार यांनी त्‍यांचे मत मांडले असेल. त्‍ महाविकास आघाडीच्या मजबुतीकरणासाठी मी वकिली करतो आहे. आमच्यासाठी शरद पवार यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांचच ऐकतो. अजित पवार यांनी माझ्यावर  खापर फोडू नये, अशा शब्‍दांमध्‍ये शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना प्रत्‍युत्तर दिले.(Sanjay Raut )

'मविआ' च्या मजबुतीकरणासाठी वकिली

महाविकास आघाडातील पक्षांना स्‍वत:चे प्रवक्‍ते आहेत. आमच्‍या पक्षाची भूमिका दुसर्‍या कोणी मांडू नये, असे अजित पवारांनी मंगळवारी राऊत यांना अप्रत्‍यक्ष फटकारले होते. यावर बोलताना राऊत म्‍हणाले," आम्‍ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एक आहोत. जेव्‍हा शिवसेनेमध्‍ये बंड झाले तेव्‍हा महाविकास आघाडीतील पक्षांनी आपली मते मांडलीच होती. त्‍यामुळे आता आघाडीतील एका पक्षात काही घडत असेल तर आम्‍ही बोललो, असा खुलासाही त्‍यांनी केला. अजित पवार माझ्या विश्‍वसनीयतेपेक्षा शरद पवारांची भूमिका महत्त्वाची. अजित पवार यांनी त्‍यांचे मत मांडले असेल.  महाविकास आघाडीच्या मजबुतीकरणासाठी मी वकिली करतो आहे. आमच्यासाठी शरद पवार यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांचच ऐकतो, असे सांगत त्‍यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

Sanjay Raut  : फडणवीसांनी दोन राजीनामा मागून घ्यावेत

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी म्हणाले,  भाजपचा अंतर्गत सर्व्हे आता कसा काय बाहेर आला. हिम्मत  असेल तर आता  निवडणूका घेवून दाखवाव्या. लोकसभेच्या ४० हून अधिक जागा आम्ही जिंकू. महाराष्ट्रातील जनता ही भाजपाविरोधात आहे. पुढे बोलत असताना त्यांनी देवेंद्ग फडणवीस यांनी त्यांच्यातील आत्मा आणि माणूसकी जिवंत असेल तर दोन राजीनामा मागून घ्यावेत.  अस म्हंटल आहे. फडणवीस संजय राठोड यांचा राजीनामा मागणार का? राठोडांचा  भ्रष्टाचार त्यांच्याच लोकांनी उघड केला आहे. तर  दुसरा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा.  खारघर येथे रविवारी (दि.१६) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम भर दुपारी असल्याने अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. चेंगराचेंगरी झाली यात अनेकांचा मृत्यू झाला.  मृतांचा आकडा अजुनही लपवला जात आहे. आकडे हळूहळू बाहेर येतील. आजचा आकडा १४ आहे. पण हा आकडा २० असावा असही बोलल जात आहे. उष्माघात हे फक्त कारण आहे. पण तिथे नियोजन नव्हेत. पाण्याची सोय नव्हती. या प्रकरणी मुख्यमंत्री, आयोजक, संबंधित मंत्री यांच्यावरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागवावा. आता तुम्ही म्हणाल कसा मागणार ते मुख्यमंत्री आहेत. पण अगोदर राजीनामा तर मागा. याला सरकार जबाबदार आहे. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर पोलिसात जावून धुडगूस घातला असता.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT