पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदेंनी सीमाभागात जाऊन प्रचार करावा. आमची भूमिका ही महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आहे. पण एकीकरण समितीचा पराभव होण्यासाठी महाराष्ट्रातून पैसे पाठवले. एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव होण्यासाठी भाजपचा डाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदेंनी एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा. भाजप सीमाभागाशी बेईमानी करत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी भाजपचा प्रयत्न आहे. मराठी मातीशी भाजप बेईमानी करतेय. पण खऱ्या शिवसैनिकाने मराठी माणसाशी गद्दारी करू नये. शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही.
राऊत पुढे म्हणाले, समाजकारणाचे आणि राजकारणाचे प्राण असलेले शरद पवार हे नेते आहेत. देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव शरद पवारांचं आहे. शरद पवार विरोधी पक्षाचं नेतृत्व करत राहतील. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांच्या निवृत्तीविषयी चर्चा केलीय. शरद पवारांचं राकारणातील स्थान कायम आहे. 'सामना'मध्ये लवकरच उद्धव ठाकरेंची मुलाखत येईल.