पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याला भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने तलाक दिला आहे. दुसर्‍या छायाचित्रात पाकिस्‍तानची अभिनेत्री  सना जावेदसाेबत शोएब मलिक. 
Latest

Sania-Shoaib : सानियाने शोएबला दिला तलाक! वडिलांच्‍या स्‍पष्‍टोक्‍तीने चर्चेवर पडदा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याने सना जावेदबरोबर लग्न केल्‍याचे वृत्त समोर आले. यानंतर भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्‍याशी त्‍याचा घटस्फोट झाला का, असा सवाल केला जात होता. आता याबाबत सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी याबाबत स्‍पष्‍टीकरण दिले आहे. शोएब मलिक याला सानियाने तलाक होता, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. (Sania Mirza Divorced Shoaib Malik : Imran Mirza Statement )

वृत्तसंस्‍थेला दिलेल्‍या निवेदनात इम्रान मिर्झा यांनी म्‍हटले आहे की, 'खुला' अंतर्गत मुस्लिम महिलेला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार आहे.

Sania-Shoaib : 'खुला'मध्ये पत्नी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते

खुला हा घटस्फोटाचा एक प्रकार आहे. तो स्त्रीच्या बाजूने घेतला जाऊ शकतो. खुलाच्या माध्यमातून स्त्री तिच्या पतीशी संबंध तोडू शकते. घटस्फोटात पुरुष आपल्या पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे खुलामध्ये पत्नी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते. मात्र यासाठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक असते.(Sania Mirza Divorced Shoaib Malik : Imran Mirza Statement )

शोएबचे तिसरे लग्न

सानिया ही शोएब मलिकची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याने भारताच्या आयशा सिद्दीकीशी लग्न केले होते. २०१० मध्ये त्याने टेनिसपटू सानियाशी लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. लग्नाच्या १३ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्‍याचा निर्णय घेतला. यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. शोएबने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती दिली. सना जावेद ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा 2020 मध्ये उमेर जसवालशी विवाह झाला होता. मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. 28 वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या फार पूर्वीपासूनच येत होत्या.

Shoaib Malik married sana tweet

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT