Latest

सांगली : जितकी पुस्तके वाचाल; तितक्या रुपयांचे बक्षीस

दिनेश चोरगे

विटा; पुढारी वृत्तसेवा :  विटा नगरवाचनालयात बालवाचन स्पर्धेत विद्यार्थी जितकी पुस्तके वाचेल तितक्या रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र त्यास दिले जाणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप मुळीक यांनी दिली.

ते म्हणाले, सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात मुलांना मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोशल मीडिया वापराची सवय लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील विटा नगरवाचनालयाच्या बालवाचन विभागाने दि. 23 एप्रिल ते दि. 10 जून या काळात बाल वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना रामायण, महाभारतातील कथा, छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी साहित्य, पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, अकबर-बिरबल, विक्रम-वेताळ, सिंहासन बत्तीशी, हतिमताई, सिंदबादच्या सफरी, संस्कारक्षम बोधकथा, मनोरंजक बालसाहित्य आणि विज्ञानकथा अशी जवळपास दोन हजार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या स्पर्धेत दुसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करून पुस्तकांचा सारांश एका वहीत नोंद करावयाचा आहे. जितकी पुस्तके वाचेल तितक्या रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT