सांगली पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री अशा अवैध धंद्यांवर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले, विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुजित मधुकर पवार (रा. साळशिंगे रोड, विटा) याच्यावर कारवाई करून 1 हजार 155 रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी विनायक रघुनाथ रास्ते (रा. करंजे, ता. खानापूर) याच्यावर कारवाई करून 1 हजार 810 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिराळा पोलिस ठाणे हद्दीत संदीप जयसिंग पाटील (रा. कापरी, ता. शिराळा) याच्यावर कारवाई करून 1 हजार 610 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत जुगार घेणारा बाळू उर्फ मुस्तफा इस्माईल बेग (रा.वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड) याच्यावर कारवाई करून 802 रुपये किंमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. कुंडल येथे अवैध देशी दारू विक्री करणारा सचिन दशरथ कदम ( रा. जाधवनगर, कुंडल) याच्याकडून 1 हजार 210 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली .
उमदी पोलिस ठाणे हद्दीत देशी दारू विक्री करणारा सुधाकर दुडाप्पा कोळी (रा. अंकलगी, ता. जत) याच्यावर कारवाई करून 840 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. सागर आप्पासो सावंत (रा. माडग्याळ) याच्याकडून 855 रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली .
चिंचणी वांगी पोलिस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री करणारा उदयराज विश्वास शिंदे (रा. सोनसळ, ता. कडेगाव) याच्याकडून 1 हजार 400 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. कडेगाव पोलिस ठाणे हद्दीत अवैध दारूविक्री करणारा सलीम यासीन मुल्ला (रा. चिखली) याच्यावर कारवाई करण्यात आली. अवैध जुगार खेळणारा संजय सुखदेव भंडारे (रा.रामानंदनगर) याच्यावर कारवाई करून जुगार साहित्य व रोख रक्कम, असा 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारूविक्री करणार्या 7 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 8 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मटका, जुगार घेणार्या तिघांवर कारवाई करुन 1 हजार 717
पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, दिलीप ढेरे, विशाल येळेकर, अच्युत सूर्यवंशी, ए. व्ही. औताडे, एस. व्ही. रूपनर यांच्या पथकाने ही कारवाई केली.