Latest

Sana Saeed : शाहरुख खानच्या ‘या’ मुलीनं बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sana Saeed : 'कुछ कुछ होता है' चित्रपटातली छोटी अंजली आठवते का? जिने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकली होती. वडील राहुल खन्ना म्हणजेच शाहरुख खान यांचं दुसरं लग्न करण्याचा या अंजलीने निश्चय केलेला असतो. त्यात ती यशस्वी होते आणि शाहरुखचा दुसरा संसार वसवते. त्यावेळची रिल लाईफमधील अंजली आता ख-या आयुष्यात मोठी झाली आहे. ती इतकी समजूतदार झाली आहे की लग्नासाठी तयार आहे. होय, अंजली म्हणजेच सना सईदने एंगेजमेंट केली आहे.

सनाने (Sana Saeed) बादल, हर दिल जो प्यार करेगा आणि स्टुडंट ऑफ द इयरमध्ये दिसली. त्याचबरोबर तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. 2012 मध्ये बिग बॉसमध्ये आल्यानंतर ती प्रकाशझोतातही आली होती. सध्या ती फक्त छोट्या पडद्यावरच दिसते.

बॉयफ्रेंडने घातली अंगठी

नवीन वर्षाच्या निमित्ताने सनाला (Sana Saeed) तिचा बॉयफ्रेंड साबा वॉनर याने प्रपोज केले आणि अंगठी घालून तिला कायमचे आपले बनवले. सनाने एंगेजमेंटच्या फोटोंचा कोलाज करून एक व्हिडिओ पोस्ट केला असून ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये विशेष काही लिहिलेलं नाही, मात्र हार्ट, रिंग आणि लव्ह फेस इमोजी पोस्ट करून स्वत:चा आनंद व्यक्त केला.

सनाला तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून प्रपोज केले. यावेळी सना खूप आनंदी दिसते. ती बॉयफ्रेंडचा प्रस्ताव स्वीकारते आणि हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे. अंगठी घातल्यानंतर दोघेही एकमेकांना किस करतात. यावेळी सनाने काळ्या रंगाचा स्लिट गाऊन आणि थाई हाई बूट्स परिधान केले आहेत. तर तिच्या बॉयफ्रेंडने काळा शर्ट आणि डेनिम कलरची जिन्स परिधान केली होती.

सना बऱ्याच दिवसांपासून साबा वॉनरला डेट करत होती. साबा एक हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. साबा अनेकदा सनासोबतचे फोटो पोस्ट करत असतो. त्याच्या अकाऊंटवर सनासोबतचे अनेक सुंदर फोटो आणि हँगआउट्सची झलक पाहायला मिळते.

दरम्यान, साखरपुड्याचे फोटो पाहून अनेकांनी कमेंट करून सनाचे अभिनंदन केले आहे. तिचा बालपणीचा सहकलाकार परजान दस्तूरने देखील कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर तनुज विरवानी, रिझवानसह अनेक सेलिब्रिटींनीही अभिनंदन केले आहे. चाहत्यांनीही सनाला खूप आशीर्वाद दिले आहेत. कुछ कुछ होता हैं चित्रपटातील अंजलीचे पात्र अजूनही लोक विसरलेले नाहीत. कमेंट करताना लोक म्हणतात की अखेर अंजलीला तिचा खरा राहुल सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT