संपादकीय

दिसतं तसं नसतं..!

backup backup

नवी दिल्ली ः सोशल मीडियात अनेक भन्नाट फोटो व्हायरल होत असतात. काही फोटो तर तद्दन खोटी कॅप्शन देऊनही व्हायरल केले जात असतात. आताही असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. सकृतदर्शनी पाहिले तर तबकडीच्या आकाराचा एक दगड हवेत किंवा आकाशात तरंगत असल्याचे त्यामधून दिसते; पण वास्तवात तसे नाही!

आपल्या डोळ्यांवर भलताच विश्वास असतो.'चक्षुर्वै सत्यम' हे सर्वच ठिकाणी खरे ठरते असे नाही. कधी कधी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट वास्तवात तशी नसतेही. या फोटोबाबतही असेच म्हणता येऊ शकते. आपल्याला वाटते की यामध्ये हवेत उडत असलेल्या दगड दिसतो. वास्तवात हा दगड तलावाच्या पाण्यात आहे. त्याचा खालील भाग म्हणजे पाण्यात पडलेले त्याचे प्रतिबिंब आहे. हा दगड निम्माच पाण्यात बुडालेला आहे आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले आहे.

अर्थात फोटोमध्ये पाणी आहे असे न वाटता आकाश आहे असेच वाटते. त्यामुळे तलावाच्या काठावरील जमिनीवरच्या आकाशात हा दगड उडत आहे असा भास होतो! ट्विटरवर हा फोटो शेअर करण्यात आला. 'ऑप्टिकल इल्युजन'चे हे उदाहरण असल्याचे त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT