संपादकीय

अमरनाथ यात्रेचे आव्हान

अनुराधा कोरवी

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेत अडथळा आणणारे समाजकंटक, दहशतवादी हे देशाचे, काश्मीरचे आणि इस्लाम धर्माचे शत्रू आहेत. संभाव्य घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी गृह मंत्रालयाने ठोस सुरक्षा व्यवस्था केली आहे. एका अर्थाने दहशतवादावर भाविकांची श्रद्धा, विश्वास मात करेल, हे निश्चित.

अमरनाथ यात्रेला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे 62 दिवसांपर्यंत चालणारी यात्रा 31 ऑगस्टला संपणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षा आणि सुविधांवरून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. काश्मिरी नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक असलेली अमरनाथ यात्रा ही नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिली आहे. अर्थात दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेत घातपाती कारवाया न करण्याचे आश्वासन देऊनही सरकारने मात्र सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. दहशतवाद्यांनी धमक्या देऊनही त्याची पर्वा न करता लाखो भाविक अमरनाथांचे दर्शन घेण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दाखल होत आहेत. गुहेत तयार होणार्‍या शिवलिंगाचे भाविकांना मोठे आकर्षण असते.

या गुहेत शिवलिंगाबरोबरच दोन लहान बर्फाची पिंड तयार होते आणि त्यास पार्वती आणि श्री गणेश याचे प्रतीक मानले गेले आहे. गुहेच्या छताला असलेल्या एका भेगातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबापासून शिवलिंग नैसर्गिक रूपाने तयार होते. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे चंद्राच्या प्रकाशाच्या आधारावर वाढते आणि कमी होते. अशा प्रकारचे जगातील एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. अमरनाथ यात्रेत भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जात आहे. वास्तविक दरवर्षीच भाविकांच्या संख्येनुसार तयारी करण्यात येते. परंतु यावर्षी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: तयारीचा आढावा घेतला.

भाविकांची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था आणि अन्य सुविधांवर सातत्याने बैठका घेतल्या गेल्या आहेत. गृहमंत्री शहा यांनी जम्मू काश्मीरची सध्याची स्थिती आणि अमरनाथ यात्रेचे व्यवस्था याचे आकलन करण्यासाठी सुरक्षा संस्थांच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. गृहमंत्रालयाने प्रत्येक यात्रेकरूचा विमा उतरवला असून त्यांना आरएफआयडी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड देण्यात येत आहे. याशिवाय गृहमंत्र्यांनी प्रवास मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर दिला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये पहलगामपासून सुरू होणार्‍या 39 किलोमीटरच्या प्रवासी मार्गावर वायफाय हॉटस्पॉट बसविण्याचे निर्णय घेतला आहे.

भाविकांसाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणे, 6 हजार फूट उंचीवर रुग्णालय स्थापन करणे आणि कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर तैनात करणे यासारख्या बाबींचे नियोजन केले आहे. चारधाम यात्रेतील भाविकांची वाढती संख्या पाहून अमरनाथ यात्रेतही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्याचे आकलन केल्यास 1993 पासून आतापर्यंत 14 हल्ले झाले आणि त्यात 68 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा हल्ला केला होता.

2000 मध्ये अमरनाथ यात्रेवर दुसरा मोठा हल्ला झाला आणि त्यात 32 भाविकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये बसवर हल्ला झाला होता. या घटना पाहता यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षा हा एक मोठे आव्हान सुरक्षा दलासमोर राहिले आहे. अर्थात हे आव्हान वेळोवेळी समर्थपणे पेलले आहे. काश्मीरमधील हजारो मुस्लिमांचा व्यवसाय अमरनाथ यात्रेवर अवलंबून आहे. घोडे, पिट्टू आणि टेंटचा व्यवसाय हा यात्रेशी संबंधित असतो आणि म्हणून काश्मिरी नागरिकांना या यात्रेची प्रतीक्षा असते. असे असतानाही दहशताद्यांचे नापाक इरादे काश्मिरींच्या हृदयावर घात करण्यासाठी आसुसलेले असतात.

– प्रियांका जाधव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT