waste-to-biogas-conversion | कचरा ते बायोगॅस 
संपादकीय

पहिला चहा | कचरा ते बायोगॅस

पुढारी वृत्तसेवा

सुखिया : अबब, काय ढीग साठलेत रे बबुवा! ते उचलायचे काम अमीच घ्यायचे.

मुखिया : अबे सुखिया, हा कचरा उठवण्याचा काम तुला नाही मिळणार. ते काम ग्रामपंचायत आणि महारपालिका करतात.

सुखिया : पण, आता हे ढीग जरा जास्त नजर आते है. गल्ली-बोळात कचरा साठून राहिला आहे. घराघरासमोर तेचं विचारतो आहे भंगारसाठी.

मुखिया : कचर्‍यापासून बायोगॅस तयार करणार आहे सरकार. आता गॅसची टंचाई भासणार नाही. भंगार विसर.

सुखिया : हा कचरा तर रोजच्या रोज नेते ना गाडी. मग, अजून इथेच पडून आहे?

मुखिया : तुझं का लक्ष रे कचर्‍यावर?

सुखिया : ते आम्ही कचर्‍यातल्या वस्तू भंगारमदी देऊन चार पैसे मिळत है. इसलिये.

मुखिया : चार पैसे तुम्हीच मिळवा बाहेरून येऊन. आम्ही काय मख्खी मारायची.

सुखिया : मुखिया तू मख्खी मार नाही, तर अजून काही कर. मी नुसते विचारत आहे.

मुखिया : तू विचारत आहे; पण कचर्‍याला हात नाही, पायपण लावत नाही आहे.

सुखिया : मग, तुम्हीच नको म्हणते.

मुखिया : अरे कसं समजावू? अरे डुचक्या, मला म्हणायचंय... कचर्‍याला हात नाही पायपण लावायचा नाही या ठिकाणी. समजले?

सुखिया : सुका कचरा नेतो. बाकी कचर्‍याला पाय बी लावत नाही.

मुखिया : खबरदार. थांब महापालिकेलाच कळवतो. लय भिनभिनतोय कचर्‍याभोवती...

सुखिया : आता नाही भिन्न भिन्न नार. (समोरून कचरा टाकायला बायका येतात)

एक बाई : (चिडून) थोबाड फोडू काय रे तुझे! काय भिन्न भिन्न नार काय?

मुखिया : खा मार भिन्न भिन्न नारकडून.

सुखिया : भाभीजी मी काय नाय बोलत है. वो मुखिया ही बोलत है, वैसन हम बोलत है.

दुसरी बाई : (मोर्चा मुखियाकडे) हाच बोलला पहिला. मी ऐकले.

मुखिया : मी भिनभीननार असं म्हणालो.

तिसरी बाई : तेच ना. कचर्‍याभोवती भिन्न भिन्न नार? यालाच मारा पहिला.

मुखिया : हा कचरा घेऊन निघाला होता म्हणून म्हटलं काय भिनभिनतोस कचर्‍याभोवती?

चौथी बाई : खबरदार... हा सुखिया, तू आता भंगारासाठी कचरा न्यायचा नाही. जा निघ. खूप नोटा छापल्या तू. सरकारला छापू दे. म्हणजे सरकार आम्हाला उद्योगधंदे तरी मिळवून देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT