बिन सूद : अमेरिकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ. इराण वचनाला पक्का आहे.
पत्रकार : काय वाटते आपल्याला युद्ध कोण जिंकेल?
बिन सूद : ट्रम्पला सोडणार नाही. बदला लेकर रहेगा इराण.
पत्रकार : पण, एकूण चित्र पाहता तात्याने इराणचे कार्टून चॅनल करून टाकले. ‘टॉम अँड जेरी.’ सो जेरी भाई आपण हरणार. तात्या काही हटत नाही रणभूमीवरून.
बिन सूद : आम्ही हटवू.
पत्रकार : बाकी इराणला लपायला फार आवडते. काय ते भुयारी मार्ग, काय त्या खाणी एकदम ओके.
बिन सूद : उगीच काय ओके करत चिडवायचं एखाद्याला.
पत्रकार : इथं सगळं ओके म्हणून तर अमेरिकेचे चालेना डोके.
बिन सूद : तात्या बिन कामाचं पाळीव टॉम आहे. इराण म्हणजे उंदराचे साम—ाज्य वाटते का याच्या सापळ्यात अडकायला?
पत्रकार : सापळा लावून काय उपयोग? तुम्ही अंडरग्राऊंड गुप्त गुहांमध्ये वास्तव्य करता. अमेरिका शोधू शकणार नाही.
बिन सूद : तुमचे प्रश्न अजून अमेरिकेच्या भोवती फिरत आहेत. आपण बोलत-चालत आमच्या अंडरग्राऊंड गुहेत पोहोचलो.
पत्रकार : ई... (दातखिळी बसल्याप्रमाणे) अरे, हे ठिकाण तर अमेरिकेला माहिती आहे. मला सोड बाहेर, मी जातो इथून.
बिन सूद : आता नाही. मला सेफ वाटत नाही बाहेरचे वातावरण तोपर्यंत इथेच इंटरव्ह्यू.
पत्रकार : जीव महत्त्वाचा की इंटरव्ह्यू?
बिन सूद : आम्ही सगळ्या इराणवासीयांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित करायचे ठरवलंय. तूपण बलिदान दे.
पत्रकार : मी वार्ताहर आहे. कोणत्या पक्षात नसल्याने मला माझे काम करू द्या. पुढील प्रश्न! आता खर्गच्या बेटावर हल्ले केले तात्यांनी. त्यावर काय बोलायचंय का?
बिन सूद : ये धरती बलिदान मांगती है. इथे तेलाच्या खाणी जास्त आहेत. म्हणून तात्याने झपाटल्यासारखे हे कृत्य केले. त्याला पकड आणि इंटरव्ह्यू घे.
पत्रकार : झपाटलेला तात्या? बेटावर आला की तेलाच्या खाणीपण अमेरिकेत घेऊन जाईल. हल्ले न करता. त्याने एलियन कोंडून ठेवलेत. खर्गचा नर्क करून टाकेल तो धरतीवर. या नरकातून मला आताच वाचवा.
बिन सूद : सर सलामत तो पगडी पचास. जा पळ. पुन्हा असले प्रश्न घेऊन येऊ नको आणि नको ते चॅनलवर फेकू नको. नाही तर खर्गवर डांबून ठेवेन.