पहिला चहा : चीनशी पंगा..? 
संपादकीय

पहिला चहा : चीनशी पंगा..?

पुढारी वृत्तसेवा

(व्हाईट हाऊसच्या आलिशान शामियान्यात ट्रम्प आणि ट्रम्पचे जेरीबापू अर्थात जावईबापू)

ट्रम्प : मी कुठेतरी लपलेलोच बरा.

जेरी : सासरेबुवा, मी बघतो काय ते. उद्याच मी इराणशी बोलून घेतो.

ट्रम्प : टेक यूअर टाईम जेरी. ऑल दी बेस्ट!

जेरी : जिन पिंग खूपच धमकी देत आहे. यावर काय तोडगा?

ट्रम्प : ते तू बघ. माझे डोके फक्त शस्त्र निर्मितीवर आहे.

जेरी : शस्त्रसाठा संपला आहे; पण आता होर्मुझचा निर्णय लगेच झाला पाहिजे.

ट्रम्प : मी नाकाबंदी उठवणार नाही.

जेरी : जिन पिंग उठून बसला आहे काय ते बघा... (निघून जातो)

ट्रम्प : (स्वगत) या जेरीला टॉमकडे पाठवले पाहिजे. सारखा मला छळतो. बाकी जिन पिंग आमची शस्त्रे संपत आल्यावर तोंड उघडतोय. बघून घेतो.

(जिन पिंग सौदी अरेबिया किंग मोहम्मद बिन सलमानला फोन करतो.)

बिन सलमान : बोलो चीन ए इल्लाही. काय काम काढलात.

जीन पिंग : मी वॉर्न करतोय. ते ऐकायचं.

बिन सलमान : सिधे धमकी पर उतर आये?

जीन पिंग : तू उकसवले आहेस ट्रम्पला. तूच आता होर्मुझमधील नाकाबंदी उठवायला सांगायची. तो जेरी इकडे येतोय भेटायला मला.

बिन सलमान : जेरी काय करणार बिचारा! ट्रम्प त्याला समझुतीचा बकरा म्हणून पाठवतो सगळीकडे.

जिन पिंग : तुला तर समजायला हवं चीन शी पंगा घ्यायला पाहिजे की नाही ते?

बिन सलमान : पंगा तर मी घेतला. त्यात काही बदल नाही करणार चीन के चिंगम. जुबान के पक्के है सौदी के प्रिन्स!

जिन पिंग : तीच जुबान ताब्यात ठेवा.

बिन सलमान : आमची जीभ आमच्याच ताब्यात आहे. इराणशी तुम्ही मैत्री केलीय ती निभावा यापुढे. आम्ही नाकाबंदी चालू ठेवू.

जिन पिंग : आमच्याशीही लढावं लागेल.

बिन सलमान : ते ट्रम्पशी डायरेक्ट बोला.

जिन पिंग : हे तुलाच करावं लागेल नाही, तर आमच्याकडेपण शस्त्रे आहेत. लगेच निर्णय घेतला जाईल. आम्ही होर्मुझची नाकाबंदी हाणून पाडू.

बिन सलमान : मला ट्रम्पचा कॉल येतोय. नंतर बोलतो. (डिस्कनेक्टेड)

जिन पिंग : रास्कल. अब चीन लेगा पंगा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT