पहिला चहा : नाकाबंदी..! 
संपादकीय

पहिला चहा : नाकाबंदी..!

पुढारी वृत्तसेवा

ट्रम्प : (ब्रिटन ला कॉल) आर यू रेडी नाकाबंदी?

ब्रिटन : नो. वी आर नॉट रेडी? नाकाबंदी?

ट्रम्प : (फ्रान्सला कॉल) आर यू रेडी नाकाबंदी?

फ्रान्स : व्हॉट नाकाबंदी? बी सीरियस. तुम्ही गाणं गात आहात ट्रम्प?

ट्रम्प : येस. 1990 साली ही इंडियन मूव्ही पाहिली.

फ्रान्स : मग?

ट्रम्प : ती इम्प्लिमेंट करतोय होर्मुझवर.

फ्रान्स : व्हिलेन.

ट्रम्प : नोऽऽ नो! हीरो आहे मी. लेट मी ट्राय धिस रोल. डिस्कनेक्ट कॉल. टेक केअर.

फ्रान्स : गो टू हेल.

ट्रम्प : (ब्रिटनला कॉल) नाकाबंदी, नाकाबंदी, नाकाबंदी (गाणे गात) नाका नाका नाका बंदी... नाकाबंदी! काय ठरलं?

ब्रिटन : यू लॉस्ट युवर माईंड?

ट्रम्प : नाकाबंदी करायची आहे. तुम्ही कोणी हेल्प नाही केली, तरी नाकाबंदी होणार.

ब्रिटन : गो अँड ट्राय. सगळ्या देशांविरुद्ध जाऊ शकत नाही तू ट्रम्प.

ट्रम्प : इराण ज्या देशाकडून टोल घेतो, त्याला मी होर्मुझमधून जाऊ देणार नाही. जिथे टोल तिथे नाकाबंदी.

ब्रिटन : पण, इराणने टोल नाही घेतला.

ट्रम्प : चीनवर लक्ष आहे माझं. त्याला नव्वद टक्के ऑईल इराणकडून सप्लाय होतो. मग, भरूनपण तेल नेऊ देणार नाही कोणाला.

ब्रिटन : हाती शेवटी मगच येईल. दे माय!

ट्रम्प : जोकिंग?

ब्रिटन : तुम्ही विषय देत आहात.

ट्रम्प : मित्र म्हणता आणि नाकावर बसता?

ब्रिटन : नाकाबंदी उठवा. आमचा निषेध आहे याला. तुम्ही हप्ता वसुली करत आहात. जहाजे सोडवा. महागाई वाढवून ठेवाल. तुमचे खायचे वांदे होतील.

ट्रम्प : म्हणूनच नाकाबंदी करणार. इराणने अटी मान्य नाही केल्या याचा तीव्र निषेध. मी जावयाला पाठवले, तरी मान पान ठेवला नाही.

ब्रिटन : काय पेहरावा करायचा राहिला का इराणने? इंडियन कल्चर फॉलो करता...

ट्रम्प : जे आवडते ते करतो. पटले तर बघा नाही तर गेला खड्ड्यात.

ब्रिटन : खड्डे तर तुम्ही पाडून ठेवले. भगदाडं व्हायच्या आत निर्णय बदला.

ट्रम्प : मी बदला घेतो. मी बदलणारा नाही.

ब्रिटन : अमेरिकेने का तुम्हाला अजून ठेवले? बदला हो याला. फोन ठेव. (डिस्कनेक्टेड)

ट्रम्प : बघून घेतो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT