Tadaka Article | शाब्बास डक राव..! 
संपादकीय

Tadaka Article | शाब्बास डक राव..!

पुढारी वृत्तसेवा

डक राव : (भारताला उद्देशून) किती गर्मी आहे इकडे . एसी लावा. कृपा करा.

नेता : (स्टेजवर पाठीमागच्या खुर्चीवरून उठत डक रावांच्या कानाशी बोलतो.) एसी चालूच आहे. तुमचा विषय कोणता आहे भाषणाचा? त्यामुळे घाम फुटला असेल.

डक राव : बसा तुम्ही आपल्या जागवार. मी भाषणाला चालू करतो.

नेता : अहो जागेवर असं असतं ते. जागवार म्हणजे चित्ता, गाडीचा ब—ँड असं असतं आमच्याकडे. ते कधी जागेवर बसलेले? हा हा हाऽऽऽ

डक राव : रास्कल. बॅड जोक. मी समजतो मराठी आणि इंग्लिश. डोन्ट टिच मी. समजायचं असतो समोरचा काय बोलतो. तुमचा इंग्लिश असाच असतो ते घेतोच की खपऊन. माझ्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे युद्ध थांबलं. अब्जावधी लोक वाचले. ते बघ!

नेता : म्हणजे, आम्ही फक्त तुमचं ऐकून शहाणे झालो. असं वाटतं तुम्हाला?

डक राव : होय. मी समझोता केला म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबला. नाही तर...

नेता : हा समझोता दोन राष्ट्रांतील लष्करांनी केला आहे. तुम्ही कुठेच नव्हता त्यात.

डक राव : पहलगाम हल्ल्यानंतर सगळं अचानक शांत झालं.

नेता : तुम्ही आता जास्त शिरत आहात भारताच्या मुद्द्यात. असे असते तर तुम्ही स्वतःच्या सापळ्यात अडकला नसता. आम्हाला पण खड्ड्यात रुतवून टाकलंय. एपस्टिन मास्तरचा घोळ निस्तरण्यासाठी काय घोळ घातला तुम्ही हे पाहतोय आम्ही. त्यासाठीच हे दोन तासाचं भाषण आहे आजचं तुमचं.

डक राव : हे बघा नेते, आम्ही बरेच मुद्दे इथे मांडणार आहोत. महसूल असेल अगर समझोता. आम्ही पहलगाम हल्ल्यानंतर युद्धबंदी घडवून आणली. वीस दशअब्ज लोकांचे प्राण मी युद्ध टाळून वाचवले आहेत. हे मी बोलणारच. माझं भाषण लांबलं तर लांबूदे!

नेता : उगीच शब्दांच्या टिपर्‍या नका वाजवू. खोट्याचं खरं इथं चालत नाही.

डक राव : तरीही आम्ही बोलणार की, आम्ही पहिला रुजू झाल्यावर आठ युद्धे थांबवली. तुमच्यासाठी. तुमची मदत म्हणून. आम्ही मुद्देसूद बोलणार नाही. कितीही वेळ लागू दे या ठिकाणी.

नेता : भाडं आम्हाला द्यावं लागतंय या ठिकाणी. तिकडं तुमच्या देशात मोठी भाषणं देताच की! इथं आम्हाला पण बोलू द्या. सगळे मुद्दे गुंडाळा आणि जा तिकडे!

डक राव : मी गुंडाळायलाच आलो आहे.

नेता : शाब्बास! खरं बोलला डक राव! धन्यवाद!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT