दिनू मास्तर
झाले गेले गंगेला मिळाले
सगळे आता विसरून जा
किती दिस वाट बघायची
आम्हाला बी संग घेऊन जा
काका आता दमलाय तुमचा
उघड्यावर पडली पोरंबाळं
रेल्वे तुमची एक्स्प्रेस हाय
ठेऊ द्या आम्हास डब्यात पाय
तुमच्याकडंच शोभतंय आमचं घड्याळ
तुतारीचं आमच्या काय खरं न्हाय
कोंबडी न्हाय तर कोंबडा न्हाय
सत्ता न्हाय तर काका न्हाय
निसती टेकाय जागा द्या डब्यात
बसल्या बसल्या झोप काढीन
स्टेशन आल्यावर लगी तुम्हाला
पाण्याच्या बाटल्या आणून देईन
काढून टाका राग म्हणावं
वहिनींची समजूत घालून टाका
भाऊबंदास्नी असं सोडू नका
राग आता सोडून टाका
सूनबाई तुम्ही बारामतीच्या
परक्या का हाय आमास्नी
पोरगीपरास सून मोठी
पटलंय सारं आता आमास्नी
शेवटी शेवटी दादाबी म्हणाले होते
रडताय काय बेट्यांनो
पाण्यावर काठी मारली म्हणून
पाणी कधी दुभंगत नाही
घाई करा वैनी आता
व्हेंटिलेटरवर आहे तुतारी
थोडासा ऑक्सिजन उधार द्या
तेवढीच येईल तिच्यात तरतरी
उतणार नाही, मातणार नाही
पार्टीत तुम्ही घेतल्यावर
हाताची घडी तोंडावर बोट
ठेवल्याशिवाय राहणार नाही
काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं..
आमास्नी बी पार्टीत येऊ द्या की रं
ढकलू नका भाईर असं
कंबारडं आमचं मोडलं की रं...