पहिला चहा | कुंभमेळ्यात हरवले मांजर! 
संपादकीय

पहिला चहा | कुंभमेळ्यात हरवले मांजर!

पुढारी वृत्तसेवा

राऊजी भाऊचे मांजर मेळ्यात हरवले. ते अपक्ष घेऊन पळाले. त्यामुळे नाशकातल्या सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी राऊ साहेब एवढे उद्विग्न होऊन मीडियासमोर बोलले की, आकाशपाताळ शांतपणे एकत्र येऊन ऐकतात की काय आणि तेच होणार, जे मी बोलत आहे, असा बोलण्यातला आर्जव मीडियाला खेचून धरत होता. मांजर मिळेना. त्यामुळे भलतेच तिळपापड झाले. मीडियाने बाजूला ठेवून दिलेले माईकप्रमाणे आपले मत तूर्त तरी बाजूलाच ठेवले असते तर बोभाटा कमी झाला असता. आपला आवाज कुठे पोहोचवावा याचे भान असावे लागते. धर्मध्वजा फडकवण्यावरून एवढे कोण रागावते का भाऊ? बरं, आपण उपस्थित केलेले प्रश्न आपल्या प्रसिद्धीसाठी तर नाहीत ना याची फार तर उजळणी राहूदे मीडियासमोर उपस्थित होण्यापूर्वी डायरेक्ट चाचणी करावी महोदयांनी एवढेच होते.

हे पाहुणे आपल्या माईकच्या वाजंत्र्या तोंडासमोर आणणार कसे? म्हणून मुद्दाच तसा मुद्दाम मांडला राऊसाहेबांनी. अखंड हिंदुत्वाचा प्रश्न आखाड्यात उतरवला मारुतीरायांच्या कृपेने. काळाराम मंदिरावरच्या धर्मध्वजावरचे हनुमंत यांनाच प्रसन्न व्हावे का? हिंदुत्व म्हणजे काय फक्त मराठेच, अशी विधाने करून भारतातले इतर धर्म यात भेदभाव आखला आपण! अमराठीही हिंदू आहेत भारतीय असल्यामुळे. हे खोडून काढणे जमणार आहे का? यांचे बोलणे ऐकून परदेशी कावळे भारतीय मंदिरात प्रवेशतील का? अधर्म आणि धर्म यांमध्ये राऊ साहेबांची सत्ता. दोन्हीमध्ये बोभाटा आणि आगलावू धोरण. त्यामुळे मांजर पण यांना वैतागून पळून गेली ती मिळालीच नाही. अजून त्रस्त स्वरात...

राऊ जी : उधमजी यांना आमंत्रण नाही, महामहीम आणि त्यांच्या पक्षाचा हिंदुत्वाशी काय संबंध? हिंदुत्व निर्माण केले कोणी, ध्वज कोण फडकतो, हिंदुत्व म्हणजे एपस्टिन आणि खरात अशांना पाठिंबा नाही. ध्वजावरचे हनुमंत आपणास पावतील का? आमचे हनुमंत म्हणजे निष्ठावंत नेते महामहीम यांनी पळवले. हनुमान पावेल का?

असे गल्लीबोळात किस्से ऐकवल्याप्रमाणे मीडियाच्या न वाजणार्‍या माईकवर आपण ओरडत राहून काय साध्य केले? तो खरात आणि एपस्टिन तुमचे नसतील कशावरून? मीडियाने कान बंद न करता माईक बंद केले. हे समजले का आपणास? हनुमान विरोधी पक्षास प्रसन्न झाले असे न म्हणता पळून गेले काय म्हणता. आपले मांजर हरवले आहे. हनुमान नाही. याची नोंद ठेवावी. क्षमस्व. एक भारतीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT