पहिला चहा | राखी के सपने..! 
संपादकीय

पहिला चहा | राखी के सपने..!

पुढारी वृत्तसेवा

बिग बॉसच्या घरात सावंतांच्या राखीचे पदार्पण. कोणा एका सावंतांच्या वाड्यावरचं कोकणातलं सुख बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल, याचं कसं काय आपण माप लावू शकतो? तर ते माप राखीने स्वप्नात ओलांडले.

राखी : (अर्थात स्वप्नात). बिग बॉस, मला इथे जाम उकडते आहे. कोकणातला पाऊस इथे येत नसतो का?

बिग बॉस : माणसं कोकणस्थ असतात, पाऊस नाही. तो जिकडे तिकडे तिकडचाच असतो. वारा जिकडे, तिकडेच गारा पडतात.

राखी : मी गारा वेचते, कोकणामदी. इकडे गाराबिरा नाही पडत का?

बिग बॉस : गारा वेचून काय करते तू?

राखी : मी आज बिग बॉसमध्ये एन्ट्री केली. म्हणून सेलिब्रेट करायचं म्हणते.

बिग बॉस : अगं, पण पेढे वाट, मिठाई वाट, गारा काय वेचते? आणि कुठून आणणार गारा?

राखी : आपण असा एखादा टास्क नाही का ठेवू शकत? गारांचा पाऊस पाडू शकता का?

बिग बॉस : हो. शुअर; पण गारा म्हणून आईस बॉल्स वापरावे लागतील.

राखी : अरे बापरे! डोक्यावर पडल्यावर काय होईल?

बिग बॉस : तू डोक्यावर पडलेलीच आहेस. गारा डोक्यावर पडून काय होणार अजून?

राखी : डोक्यावर पडलेल्या गारा! हे हे... असं म्हणता येईल.

बिग बॉस : अगं बाई, काय म्हणायचं ते तुझं तुझं बघून घे. दिलेले टास्क कंप्लीट कर.

राखी : कोकणात या दिवसात नारळी, पोफळी फोफावतात. इकडे नारळाचे झाड नाही का? त्या समुद्रातल्या बोटी आणि समुद्र! इकडे तसं फील नाही की थ्रिल नाही. लोक ट्रोल करतात फक्त!

बिग बॉस : सावंतानाच इथलं इंटिरिअरचे काम द्यायला पाहिजे होतं. म्हणजे तुझ्यासाठी कोकणचा फील आणला असता. फूल..!

राखी : बिग बॉस आज राखीपौर्णिमा आहे म्हणून कोकणच्या दर्याची आठवण आली. इथे आपण राखीचा इव्हेंट ठेवूया का?

बिग बॉस : अरे बापरे! ती राखी आणि ही राखी भिन्न भिन्न तरीके की है. तू जाग जा....सपना देख रही है.

राखी : (डोळे उघडत) कुठे आहे मी? सावंतांचा वाडा इतका कसा डेकोरेटिव्ह? कुठे गेला समोर दिसणारा समुद्र, कुठं आहेत नारळी आणि पोफळी?

बिग बॉस : राखी ताई? चटर पटर...बंद कर मुह का शटर. भूल जा जंतर-मंतर, समुंदर. बोटोक्स से हो गई है बंदर. अब कूदना बंद कर..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT