Tadka article | गद्दार म्हणू नये कुणाला...  
संपादकीय

Tadka article | गद्दार म्हणू नये कुणाला...

पुढारी वृत्तसेवा

चेहरा एकदम खुलून आलाय तुझा, काय विशेष?

बेटा : मम्मा, मला बिट्टू भेटला होता... अगदी संसदेच्या दारात.

मम्मा : म्हणून एवढं खूश काय व्हायचं त्यात?

बेटा : अगं, मी त्याला डायरेक्ट ‘ये माझ्या गद्दार मित्रा, तुझे स्वागत आहे’ म्हणालो.

मम्मा : अरे थेट असे कुणाला गद्दार म्हणतात काय? पूर्वीचा तो तुझा मित्र होता ना?

बेटा : हो मम्मा. आम्ही शांतपणे आमच्या निलंबित खासदारांसमवेत निदर्शने करत होतो. तिकडून बिट्टू आला आणि आमच्याकडे पाहून हातवारे करू लागला आणि आम्हाला काय तरी म्हणाला...

मम्मा : म्हणून काय आपण आपला संयम सोडायचा?

बेटा : अगं मम्मा, आमच्या पक्षात असताना आम्ही त्याला काय कमी केले होते? लगेच असे वागायचे का?

मम्मा : बरोबर आहे; पण एकाने चिमणी मारली म्हणून दुसर्‍याने कावळा मारायचा का?

बेटा : मम्मा, ती म्हण अशी आहे की, एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारायचे का?

मम्मा : जे काही असेल ते असेल. दोस्त होता ना तो तुझा एकेकाळी?

बेटा : पण, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम—भर का गम है उधार दिया है...

मम्मा : म्हणून काय त्याला गद्दार म्हणायचे?

बेटा : मम्मा, मी एकदाच त्याला गद्दार म्हणालो. तिकडे उद्धोजीराव त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ गद्दार, गद्दार म्हणून उद्धार करत असतात.

मम्मा : तो त्यांचा स्वभाव आहे. ते एखाद्याला गद्दार म्हणू देत नाही, तर खोका म्हणू देत. ‘बुरा मत बोलो, बुरा मत सुनो’वाली आपली संस्कृती आहे.

बेटा : मम्मा, जो आपला विश्वासघात करतो, त्याला गद्दार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?

मम्मा : बेटा, आता आपला वाईट समय आला आहे.

बेटा : चांगला समय यायला मम्मा आम्ही काय केले पाहिजे?

मम्मा : बेटा, चांगला समय आपल्याला लवकर येईल असे दिसत नाही. निदान आपल्यातले जे लोक त्यांच्यात गेले आहेत, त्यांना तरी चांगले दिवस येत आहेत, हेही नसे थोडके!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT