Tadaka article | टिंग पिंग चीन..! 
संपादकीय

Tadaka article | टिंग पिंग चीन..!

पुढारी वृत्तसेवा

चिनी : भारतात सगळं शांत आहे. तिकडे जाऊन चिनी मातीची भांडी तरी विकता येतात का बघू? हे इराणी लोक काही युद्ध थांबवायचं नाव घेत नाहीत.

अमेरिकी : चिन्या, हे बघ. इराणी लोक आता ऐकणारे नाहीत. तेलाचे वांदे केलेत त्याने तुमचे-आमचे. यांना आम्हीच उठवून बसवलं; पण हे आता आम्हाला उत्तरं देत बसणार. आम्ही हल्ले चढवणार. आम्ही पण नाही ऐकणार. तू आपला ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत राहा. भारत दत्तक घेईल तुला.

चिनी : तुमचं काय जातं. आम्ही ऐंशी टक्के इराणवर अवलंबून. आमच्या वस्तू इराणमध्ये जास्त विकल्या जातात. त्या कोण घेणार? तुम्ही त्याच्या म्होरक्याला घालवलात. भारताने चिनी वस्तूंवर बंदी आणली.

अमेरिकी : ग्रहण लागलं तुम्हाला. उद्या जगाच्या नकाशावरून तुम्ही गायब. इराणसोबत तुम्ही पण आमच्या लिस्टवर आहात.

चिनी : बाप रे! फुल्ल तयारी झालीय, आम्हाला नकाशावरून आकाशात पाठवायची.

अमेरिकी : काय करणार? तेलाचे वांदे...

चिनी : मग, तुम्ही अशा चाली खेळला, तर खरं नाही. इराणी लोक तुम्हाला ऐकणार नाहीत. प्लॅन ए, बी, सी तयार आहे त्यांचे.

अमेरिकी : आम्हाला त्यांचा ‘डी’पण माहीत आहे. त्याला पण उडवून लावू.

चिनी : काय आहे त्यांचा प्लॅन ‘डी’? मिसाईल उद्ध्वस्त केलं तुमचं. जागे व्हा. आमच्यासाठी डाव मांडला तुम्ही, इराणी लोकांनी हाणून पाडला.

अमेरिकी : सत्ता आमच्याकडे राहणार. इराणमध्ये आमचच पीक पिकणार यापुढे.

चिनी : टिंग पिंग चीन...!

अमेरिकी : शिवी होती का ही? सगळे पडेल उच्चार! मिसाईल पडलं देशावर तर कसा आवाज होईल, ते जरा एक्सप्लेन करा.

चिनी : टांग टांग. काय करायचं ते करा असं म्हटलं.

अमेरिकी : ऑल राईट! पण, अशा आवाजाचं मिसाईल इराणला आजच पाठवले. आम्ही यापेक्षा मोठ्या आवाजाचं मिसाईल ट्राय करतो. अतिरेकी देश संपवायचा आहे. आम्ही ताब्यात घेऊ सगळं लवकरच.

चिनी : आम्ही काय करू युद्ध संपेपर्यंत?

अमेरिकी : मिसाईलचे आवाज ऐका. हा हा हाऽऽऽ

चीन : टांग ...

अमेरिकी : टांगा पलटी घोडे फरार. गेट लॉस्ट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT