Tadaka article | लक्ष्मीजी फाईल के भितर... 
संपादकीय

Tadaka article | लक्ष्मीजी फाईल के भितर...

पुढारी वृत्तसेवा

ढेरपोटे : (ढेकर देत, कार्यालयामध्ये कॉम्प्युटरवर कामाची चाळवाचाळव करत) अरे, ती शर्माची फाईल आण इकडं.

कारकून : (लांबूनच कपाटातली फाईल टेबलवर सरकून पुनः कामाला लागतो आणि बारीक आवाजात) नावाप्रमाण सुटलेत साहेब. किती रंगाच्या पट्ट्या त्या फाईलवर वाढत्यात आता काय माहीत? हिरवी, लाल... अबाबाऽऽऽ

ढेरपोटे : इकडे रे ये!

कारकून : (टेबलजवळ येत) काय सायेब?

ढेरपोटे : काय चाललंय तुझं. बडबड करण्यापेक्षा काम कर. मार्कर घेऊन ये.

कारकून : सायेब, या येळला कोणता रंग? लाल का हिरवा?

ढेरपोटे : तुला काय करायचेत रे नसत्या चौकशा. लाल रंगाचा घेऊन ये. बघत काय उभायस? नको तिथं थोबाडाची चौकट करून ऑ करत उभा राहत जाऊ नको.

कारकून : (पुटपुटतो) हे पट्टं नको तिथं उठंल तवा कळंल.

ढेरपोटे : हे बघ मेडिकलवाला येणार आहे. आताच चहा ठेवून जा.

कारकून : सायेब, आमचं बघा की!

ढेरपोटे : त्या अडीच लाखांच्या कामात घेतलास ना. बरं हे घे. तू आहेस म्हणून कामं होतात बिनधास्त. जा आता.

वर्मा : येऊ का साहेब?

ढेरपोटे : आलाच आहात आपण. बसा!

वर्मा : त्या कामासाठीच आलोय. ही केस मिटली पाहिजे. नुसताच वेळ चालला आहे साहेब. माझी चूक होती, मी माझ्या मेडिकल शॉपमध्ये असा हलगर्जीपणा केला. यातून सोडवा मला. पुन्हा अशी चूक नाही होणार. आता पुढचं सगळं आपल्या हातात आहे.

ढेरपोटे : ते सगळं ठीक आहे; पण मी काय करणार. सगळं आता तुम्ही मॅनेज करायचं.

वर्मा : मी समजलो नाही.

ढेरपोटे : (त्या केसची फाईल लाल हिरवे पट्टे ओढलेली वर्मासमोर सरकवत) त्या पट्ट्या वाचा वरच्या. समजेल.

वर्मा : हे काय आहे, खरंच माहिती नाही.

ढेरपोटे : (लाच घेण्यासंदर्भात आकडा सुचवत) झटपट पटापट ‘लक्ष्मी’जी फाईल के भितर रखके जा सकते हो. तुला काम झाल्याशी मतलब. काय?

वर्मा : तुमच्याकडे पट्टे ओढलेल्या फायली आहेत म्हणून मी पट्टेवाले येताना घेऊनच आलोय. सांगा कुठे ओढायचेत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT