पहिला चहा : ठाणेदारी आणि कंदी पेढे  
संपादकीय

पहिला चहा : ठाणेदारी आणि कंदी पेढे

पुढारी वृत्तसेवा

पोलिस : कामात अडथळे आणू नका. आमची जबाबदारी पार पाडू द्या. निवडणुका आल्या की असलं सगळं बघावं लागतं.

मंत्री : कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. सातारकरांच्या नादी नका लागू. पेढे कुस्करून बासुंदी करतात तसे करत आहात की. गर्दी हटवता येत नाही तर कसली पदं मिरवता. नेते आहोत आम्ही. लांब राहून काम करायचं.

पोलिस : गटबाजी आणि तुकड्या करायला परवानगी नाही आम्हाला. जी कामं करायची आहेत ती चोख करतो आम्ही साहेब.

मंत्री : जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय आम्ही. तुम्ही आम्हाला शिकवता?

पोलिस : सामंजस्याने होऊदे. आमचा भार हलका होईल. मुद्दाम मुद्दा वाढू देऊ नका. नाही तर राजेंच्या भूमीत दंडुकेशाही करावी लागेल.

मंत्री : करूनच दाखवा. मग आम्ही आहे आणि तुम्ही.

पोलिस : साहेब, सभागृहातली अरेरावी आमच्याशी कराल का आता? तिकडे जास्त गरज आहे तुमची. जा मतदान करा आधी.

मंत्री : मघापासून धक्के देत ढकलत आहात. गर्दीचा फायदा घेऊ नका. आम्ही बघतो काय ते आमचं.

पोलिस : आम्ही धरणं धरून बसणार्‍यांशी असेच वागतो. पायर्‍यांवर ठाण मांडून बसणार्‍यांना पायरी दाखवतो. साहेब, आमच्या कामात हस्तक्षेप होतोय आपला.

मंत्री : सभागृहात गेल्यावर दाखवतो तुम्हाला पायरी.

पोलिस : तेच सांगत आहे, ही तुमची भाषणं तिथे झाली पाहिजेत. आता तक्रार करायला का होईना, आतला रस्ता धरा. नाहीतर कारवाई करायला लागेल (धक्का देत).

मंत्री : तुमच्या निलंबनाची व्यवस्थित व्यवस्था लावून येतो. करा अजून काय ते.

पोलिस : जा हो साहेब. नका धमक्या देऊ. पुरून उरलो आम्ही या सगळ्याला. सातारी काय, म्हातारी काय, सगळी सारखीच आम्हाला.

मंत्री : ते आता म्हातारे बाहेर आले की मगच कळेल. (सभागृहात) अध्यक्ष महोदया, आमच्यावर जी पोलिस अधिकार्‍यांकडून अरेरावी झाली, त्याचा परिणाम काय असावा तुम्ही ठरवा. अधिकारी आमच्या अंगावर येतात आणि तिरकस बोलतात. यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. सातारी कंदी पेढे वाटेन मी.

अध्यक्ष महोदया : असा तातडीचा निर्णय मी लावू शकते ट्रायल म्हणून. पण ही वात पेटत जाईल आणि सरकार तो बॉम्ब पुन्हा आमच्याकडे फेकेल. पण असू दे. मी देते निर्णय. माझ्या घरी मला तातडीने जायला हवं. सिलिंडर संपला म्हणून कॉल येत आहे मघापासून. (आदेश देत) ही सभा इथेच संपते. संबंधित पोलिस अधिकार्‍याला निलंबित करण्यात यावं ही घोषणा करते...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT