पहिला चहा : अभिनय आणि राजकारण 
संपादकीय

पहिला चहा : अभिनय आणि राजकारण

पुढारी वृत्तसेवा

रंभा (सभागृहात) : कुणीही हात न दाखवता निघून जावं इतका आपला मोठेपणा. कसोशीने चौकशी झाली पाहिजे तुमची निवडणूक व्हायच्या आधी. आमच्याकडेच पाहा आम्ही परदेशातून आलो, तरी लोक हात करून पुढे जातात.

उर्वशी : हात करून कशाला अवलक्षणी व्हायचं! बिनकामाचा कारभार. दुसरे काय?

रंभा : म्हणजे तुम्ही निष्क्रिय आहात. बोलणं पण टाकता विपक्ष उमेदवाराशी?

उर्वशी : हातच्या कंगनाला आरसा कशाला? आम्ही जसे आहोत तसे लोकमान्य आहोत. म्हणून तर एवढा चिखल आहे भोवती तरी कमळाप्रमाणे स्वच्छ आहोत.

रंभा : तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात. तुम्ही बोलू शकता; पण काही करू शकत नाही, हेच लोकांना माहिती आहे. लोकांना कळतं पण वळत नाही. काय करणार?

उर्वशी : दिशाभूल करण्यासाठी लोकांना समज कमी आहे, असंच तुम्हाला निर्देशित करायचे आहे. देशावर हक्क गाजवायचा आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही जोकरपण बनू शकता; पण जनता अडाणी नाही.

रंभा : आम्ही जोकर नाही आणि आम्हाला अ‍ॅक्टिंग तर अजिबात येत नाही. डायलॉग डिलिव्हरी छान करता तुम्ही.

उर्वशी : नेता-अभिनेता यामध्ये फरक आहे. तो आम्हाला माहीत आहे. तुम्ही ते नाही सांगितलंत तरी चालेल.

रंभा : या फरकाचा शोध घ्या; पण तुम्ही माझे वाक्य खाल्लेत. बघा इथे पण डायलॉग दुसर्‍याचे घेता इम्प्रेस करण्यासाठी. बाई तुम्ही नका राजकारणात पडू. किती तोंडावर पडाल?

उर्वशी : आम्ही पडणारे विपक्ष नाही.

रंभा : सत्ताधारी फक्त जिभेला धार करून येतात; पण बाजूला राहून तुम्हाला शस्त्राप्रमाणे वापरतात. तुम्ही शस्त्र आहात. तुम्ही नका नाकावर बसून बोलू. जरा स्थिर आवाजात बोला. अभिनय जास्त चांगला वाटेल.

उर्वशी : इथे राजकारणात डोक्यावरून पाणी गेलं, तरी सत्ता बुडवून चालत नाही. तुमची सत्ता नाही. तसेच राहा. त्यातच भले आहे.

रंभा : स्क्रिप्ट संपली असेल, तर मी बोलते. सो प्लीज, तुम्ही आता गेलात तरी चालेल. शो मस्ट गो ऑन. अध्यक्ष महोदय, हे जे बोलल्या त्याला त्यांचीही संमती नसावी. वी आर स्टील वेटिंग फॉर शोमन. धन्यवाद! त्यांनी आतातरी मौन सोडावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT