ह्युमनाईड रोबो... 
संपादकीय

ह्युमनाईड रोबो...

पुढारी वृत्तसेवा

टोबो नावाच्या इसमाने रोबो बनवला. त्याची चाचणी घेण्यासाठी पोहोचले काही मान्यवर आणि तंत्रज्ञ. रोबोने बराच वेळ मान वर केलीच नाही. तंत्रज्ञाने त्याला मान वर करायच्या कमांड दिल्या, तरी तो खाली बघूनच चालायचा आणि विशिष्ट वळणावर वळत शिष्टाचार आणि इतर सूचनांचे प्रदर्शन तो करून तिथेच हातवारे करत राहायचा. मान्यवर अवघडले. कधी होणार हे सगळं औपचारिक अगत्याचे स्वागत, तेही या ह्युमनाइड यंत्रमानवाकडून?

मान्यवर : बाळा, तू इतका छोटा, आम्हाला खाली वाकून तुझे हावभाव पाहावे लागत आहेत.

रोबो : टी टी टो टो...चिकिंगबम्ब बम..!

मान्यवर : हा कोठारेंच्या चित्रपटात होता का? असा का बोलतो हा?

तंत्रज्ञ : तो बोलत नाही. अनुकरण करतो.

मान्यवर : मी कधी म्हटलो चिकिंग बूम...

तंत्रज्ञ : ही ही ही... त्याला तसं वाटलं तुम्ही तसं बोललात असे.

मान्यवर : अरे, हे काय आहे? नको करायला लावू याला स्वागत आणि आगत्य. आग लागू दे असल्या रोबोला...

तंत्रज्ञ : त्याने शंभरावर समारंभ पार पाडले स्वागताचे. म्हणून रुजू केला आपल्या सेवेसाठी.

मान्यवर : अरे बाळा, हा मान वर करत नाही, याचा अर्थ मान ठेवतो असा होत नाही. मानेवर बसला आमच्या, तर एकटे असताना कमांड द्यायला उठायला तर यायला पाहिजे जागेवरून. याला घेऊन जा.

रोबो : चीं चीं पिंग टो टो टो...!

मान्यवर : आम्हाला याची सवय नका लावू. आधीच आमचं वय झालंय. त्यामुळे उच्चार असेच येतात. कोणाचं कोणाला काही कळणार नाही बोलणं. त्यामुळे हे असलं खेळणं नको आम्हाला म्हातारपणात. रिमोट लागतोय आणि याला. कोण करणार या उठठेवी.

तंत्रज्ञ : हातात काठी घेऊन चालावे लागणार नाही. याच्या खांद्यावर हात ठेवा, नेईल तो तुम्हाला सगळीकडे.

मान्यवर : हा... आश्चर्यच आहे. दाखवा पाहू प्रात्यक्षिक.

तंत्रज्ञ : रोबो गो. तुला टोबोची शपथ. (रिमोटने कंट्रोल करत) हे बघा हे बटण असं दाबले की, हा डावीकडे, उजवीकडे जातो. बाकी यावर लिहिले आहे. घ्या.

मान्यवर : (बटण दाबत) रोबो गो. तुला टोबोची शपथ. (डावं-उजवं बटण दाबताच रोबो पळत येऊन वाकतो) अरे हा आपल्यातला नाही. टोबो कोण आहे?

तंत्रज्ञ : त्याने तयार केला य रोबोला. आणि कमांड तशी आहे सुरुवातीची.

मान्यवर : आधी टोबोला हजर करा. नाही तर, आमचा पण रोबो करायचा. काय माहीत हा हुमनाईड रोबो आहे की बॉम्ब आहे... घेऊन जा याला. हट... गो टू टोबो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT