सरकारी आहार योजनेनुसार भाताला खनिजयुक्त आणि अन्य सूक्ष्म पोषक तत्त्वांनी युक्त (फोर्टिफिकेशन) करणे हा एक महत्त्वाचा उपाय मानला गेला आहे. यानुसार कोणत्याही धान्याला अतिरिक्त पोषक रूप दिले किंवा त्यातील पोषक घटक वाढवले, तर कुपोषणाच्या समस्यांवर समाधान करता येऊ शकते; पण आता बाजारातील किंवा सरकारी धान्य अधिक पौष्टिक असण्यावरचा विश्वास कमी होत आहे. फोर्टिफिकेशनची रणनीती ही काही ठरावीक आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि स्वयंसेवी संस्थांना लाभ मिळवून देणारी असू शकते. हे लक्षात घेता कुपोषणावर उपाय करताना नवा विचार गरजेचा आहे.
सरकारी आहार योजनेनुसार भाताला खनिजयुक्त आणि अन्य सूक्ष्म पोषक तत्त्वांनी युक्त करणे (फोर्टिफिकेशन) हा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो. कोणत्याही धान्याला अतिरिक्त पोषक रूप दिले, तर कुपोषणाच्या समस्यांवर समाधान करता येऊ शकते. अर्थात, आता बाजारातील किंवा सरकारी धान्य अधिक पौष्टिक असण्यावरचा विश्वास कमी होत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (पीएमईसी) एक सदस्यीय अहवालाच्या मते, कुपोषण दूर करण्यासाठी फोर्टिफिकेशन हा एकमेव योग्य पर्याय नाही. कारण, अशा प्रकारची फोर्टिफिकेशनची रणनीती ही काही ठरावीक आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि स्वयंसेवी संस्थांना लाभ मिळवून देणारी असल्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही धान्याला पौष्टिक करताना तो कोणती प्रक्रिया करतो, याबाबतच ठोस पुरावे असणे गरजेचे आहे.