श्री. श्री. रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग
आज मानसिक आरोग्य ही जगातील सर्वात मोठ्या चिंतांपैकी एक चिंता आहे. आपण लहान होतो, तेव्हा आपण नैराश्य किंवा आत्महत्या किंवा कोणत्याही मानसिक आजाराबद्दल फारसे ऐकले नव्हते.
आधीच्या पिढ्यांमध्ये, तरुणांमध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेद होती. त्यांनी जगाचा शोध घेतला आणि हळूहळू नवीन गोष्टी शोधल्या; पण आज इंटरनेटमुळे ते अनुभव तुमच्या बोटांच्या टोकावर जास्त प्रयत्न न करता उपलब्ध आहेत. आज मानसिक आरोग्यदिनानिमित्त...
सर्व अनुभव आणि उत्तेजन इतक्या लवकर पोहोचल्यामुळे त्यांना हरवल्यासारखे वाटते आणि कुठे जायचे याची त्यांना खात्री नसते. त्यांना त्यांच्या वडीलधाऱ्यांप्रमाणेच त्याच मार्गाचे अनुसरण करायचे नाही. कारण, ते त्यांना आनंदी म्हणून पाहत नाहीत. त्यांनी संपत्ती आणि प्रसिद्धी असलेल्या सर्वांना पाहिले आहे आणि त्यांचे जीवन इतके आनंदी नसल्याचे त्यांना दिसते. त्यामुळे आनंदाचा शोध घेणे स्वाभाविक आहे.
आनंदाचा शोध आज खूप लवकर वयात सुरू होतो. तथापि, त्यांना जीवनात योग्य दिशा किंवा तत्त्वज्ञान दिले गेले नाही, तर आक्रमकता आणि नैराश्य निर्माण होऊ शकते. नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे, हे आम्हाला शाळेत किंवा घरी शिकवले जात नाही.
आपण दाताची स्वच्छता शिकवतो; पण मानसिक स्वच्छता शिकवायला विसरतो. केवळ बोलून किंवा सल्ला देऊन तणाव दूर होत नाही. तणावापासून मुक्त होण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी आपल्याला काही तंत्रे आणि साधने शिकण्याची गरज आहे. येथेच ध्यान आणि श्वासोच्छवासाची तंत्रे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
ही अशी साधने आहेत जी तुम्हाला तुमचे मन शांत ठेवण्यास आणि तुम्हाला आतून आनंदी ठेवण्यास मदत करतात. असा आनंद जो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा आनंद आणणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे.
आनंदाचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे पकडणे किंवा घेणे. मुलाला वस्तू घ्यायला आवडतात. हा बाळासाठीचा आनंद आहे, जो बाळगण्याची इच्छा आहे. मिळवण्याच्या आनंदापेक्षा देण्याचा आनंद अधिक समाधानकारक असतो. जेव्हा आम्ही आनंद इतरांना