पहिला चहा | शाही टोला... 
संपादकीय

पहिला चहा | शाही टोला...

पुढारी वृत्तसेवा

भारतीय दौर्‍यावर असताना चार्ल्स यांनी मुंबईच्या डबेवाल्यांचे भारी कौतुक केले. किंग खूश झाले की पोचपावती देतात. ट्रम्पला ते आठवून चार्ल्ससाठी डिनरचा बेत आखला. वाटले डबे पार्सल देण्यापेक्षा थेट भेट करू आणि कौतुकदाखल मदत पण मागू. एक दोन मिसाईल उधार घेऊ. मग काय सांगता! चार्ल्सचे थाटात आगमन झाले. व्हाईट हाऊसमध्ये भले मोठे टेबल आणि चारी कोपर्‍यात ग्लोव्हज, शुभ्र पोशाख आणि आचारी मुकुट घालून डिनर सर्व्ह करण्यासाठी तयारीत असलेले शेफ! प्रिन्सच्या गप्पांकडे कान लावावा लागणार. आधीच ऐकू कमी येते. सावध राहून प्रिन्सशी गप्पा केलेल्या बर्‍या, या आविर्भावात ट्रम्प स्थान ग्रहण करतात.

ट्रम्प : चॉपर लँड झाले तेव्हा फुलांचा वर्षाव आणि गालिचे यात आपला शाही थाट अजून खुलून आला. नाहीतर आम्हाला ट्रोल करतात लोक, यूएफओमधून एलियन आला बघा म्हणून.

चार्ल्स : इंटरेस्टिंग हा हा हा. तुम्हाला वाटते तसे कारण, तुम्ही जसे आहात त्यापेक्षा वेगळे दाखवता. अँड इटस् युअर फेल्युअर.

ट्रम्प : लाईकवाईज!

चार्ल्स : आर यू क्रेझी! तुम्ही हे कसे मान्य करू शकता? शेफ हसत आहेत तुम्हाला.

ट्रम्प : हसू दे. थोड्या वेळात रडतील. (शेफकडे बोट दाखवत) हे यू. डिनरमध्ये जराही लापरवाही होणार नाही याची काळजी घ्या. नाऊ सर्व्ह दी डिनर!

शेफ : येस. (चार्ल्सना) व्हॉट वूड यू लाईक टू हॅव इन डिनर सर?

चार्ल्स : वन शार्क, लॉबस्टर अँड राईस.

शेफ : शार्क? लॉबस्टर यू विल गेट. सॉरी फॉर शार्क.

चार्ल्स : ट्रम्पने होर्मुझात शार्क नाही पकडले का?

ट्रम्प : प्रिन्स, सेन्स ऑफ ह्युमर इज टू गुड. शार्क पण भितात अमेरिकेत यायला. सो सोडून दिलं बिचार्‍यांना.

चार्ल्स : (पेग घेत) ट्रम्प, दाओसच्या भाषणात तू युरोपवर टीका केलीस, की दुसर्‍या महायुद्धात अमेरिका नसती तर आम्ही जर्मन भाषिक असतो. आता मी बोलतो, जर आम्ही बि—टिश नसतो तर तुम्ही फ्रेंच भाषिक असता.

ट्रम्प : (चार्ल्सचा पेग भरत) झेपत नाही तर घेऊ नये प्रिन्स आपण. तसेही आपलं कौतुक आहे. आपल्या बोलण्यावर टाळ्या येतात.

चार्ल्स : घंटा आमच्याकडून भेट. (बसा वाजवत या अर्थाने) ट्रम्प घंटेकडे पाहत प्रिन्सला स्वतः सर्व्ह करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT