किम : अबे ट्रम्प किती वाजले तिकडे तुझ्या देशात?
ट्रम्प : किती का वाजेनात. तू कारण शोधू नको युद्धाचं.
किम : 12 वाजले सांग ना.
ट्रम्प ः ये जा रे! तेल अमेरिकेच्या ताब्यात असेल. इराण हरणार लवकर. 12 तुझे वाजलेत. कोणी विचारेना.
किम : मला लढायला संधी मिळूदे. मग, बघ तुला वाटीभर तेलपण ठेवत नाही.
ट्रम्प : तू ठेव तुझ्याकडे वाटीभर तेल. अख्खी तेलाची खाण माझी असेल.
किम : मी इराणच्या बाजूने लढणार. तुला तेलाच्या खाणीत तेल गोळा करायला ठेवणार.
इराक : होर्मुझमधून जाऊन दाखवा दोघे.
बलुच : आम्ही तेलाची खाण उडवणार.
पाकिस्तान : तेल मिळाले तर पार्टी करू.
अफगाणिस्तान : अबे खजूर पे अटके लोग. तेल तो मैं लूंगा. बदले मे खजूर दुंगा.
किम: इराण सोबत लढा. नाही जमलं तर मला मदतीला बोलवा. होर्मुझ उडवून टाकतो.
अफगाणिस्तान : गप बाबा. का मध्ये येतो?
किम : मला मध्ये कोण घेत नाही म्हणूनच!
बलूच : मध्ये घेऊन काय हादगा खेळायचाय? कोणत्या देशाने काय आणला खाऊ? डबे उघडून बघणार का भाऊ? तुमची सत्तेची आणि हुकूमशाहीची भूक कमी करा.
किम : तुला पाकिस्तानचा नकाशा पाठ आहे का? फिरवून सोडून देईन. आधीच ठावठिकाणा नाही नकाशात.
पाकिस्तान : आम्ही बलुचिस्तानला भीक घालत नाही.
किम : कोण बोलतंय बघा. यांचे खायचे वांदे.
इराण : माझ्याशी पंगा घेऊन ट्रम्प तू घाईला आलास. आता जरा थंड घे. किम तू काहीच बोलू नको.
किम : झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो..! ती अरुणा इराणी आपली कोण लागते. मस्त काम करते हिंदी फिल्ममध्ये.
इराण : तू कितीही मस्करी केली, तरी आम्ही तुला डावात घेणार नाही. तू फिल्म बघ. बातम्या बघ; पण वार्ता बंद कर.
रशिया : ये किम ती दक्षिण कोरियावाली उत्तर कोरियात घुसली बघ.
किम : घुसली तर घुसूदेत. कोणी हद्दीत आला की, मिसाईल आपोआप सुटते.
जपान : आम्ही घेतलीच तर दक्षिण कोरियाची बाजू घेऊ; पण उत्तर कोरियाची नाही.
किम : आता तर मिसाईल उडालीच म्हणून समजा. मला युद्ध करायचंय. कोणी लढ म्हणेल का लढ. या सैतानाला कोणी लढ म्हणा. बघतोच!