संपादकीय

जगनमोहन – चंद्राबाबू यांच्यातील संघर्ष!

दिनेश चोरगे

एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे आंध— प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यापासून राष्ट्रीय चर्चेतून मागे पडत गेले. चंद्राबाबूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी भ—ष्टाचाराच्या आरोपांवरून अटक झाली. जगनमोहन रेड्डी 2019 मध्ये आंध— प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून नायडू, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध अनेक कारवाया झाल्या आहेत.

भ—ष्टाचाराच्या आरोपावरुन आंध— प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक झाली असली, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण, इतिहासात दक्षिण भारतातील राजकारणात अशा घटना नेहमीच पाहावयास मिळाल्या आहेत आणि भविष्यातही त्या दिसणार आहेत. तसेच भ—ष्टाचाराच्या आरोपावरून आजपर्यंत दक्षिण भारतातीलच नव्हे, तर देशातील अनेक मातब्बर नेत्यांना, केंद्रीय मंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना अटक झालेली आहे. सबब तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू यांची अटक ही भुवया उंचावणारी असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो या अटकेमुळे होणार्‍या राजकीय परिणामांचा. नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात चंद्राबाबूंचे नेतृत्व उदयाला आले. त्यांचे राजकीय कसब पाहून त्यांना चाणक्याची उपमा दिली गेली. सुरुवातीला त्यांनी एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल सरकारलाही अशाच प्रकारे साथ दिली. या संपूर्ण कालावधीत त्यांनी केंद्रावर सातत्याने दबाव कायम ठेवला आणि इच्छेनुसार आंध— प्रदेशसाठी निधी मिळविला. 1998 मध्ये राजकीय वातावरण बदलल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला साथ देणे चंद्राबाबूंनी सोयीस्कर मानले. त्या काळातही त्यांनी दबावाचे राजकारण कायम ठेवले. एकदा तर अन्नधान्याच्या मोठ्या साठ्याची मागणी आंध— प्रदेशसाठी करून त्यांनी केंद्रावर इतका दबाव आणला होता की, वाजपेयी सरकारला घाम फुटला होता. काही माध्यमांनी तर यामुळे त्यांना 'सुपर प्राईम मिनिस्टर' अशी उपाधीही चिकटवली होती. परंतु, भाजपचा पराभव होताच चंद्राबाबूंनी भाजपशी नाते तोडून टाकले. नेमक्या त्याच काळात वायआरएस रेड्डी यांनी आंध— प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवून दिला आणि चंद्राबाबूंचे महत्त्व घटू लागले. आता थेट तुरुंगात रवानगी झाल्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

यासंदर्भातील दुसरा एक पैलू म्हणजे, काही वर्षांपूर्वी जेव्हा जेव्हा एखादी अनियमितता आढळल्याच्या कारणावरून बड्या अधिकार्‍यावर किंवा नेत्यावर कारवाई केली जाते तेव्हा भ—ष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल, अशी लोकभावना समाजात दिसून यायची; मात्र गेल्या काही वर्षांत भ—ष्टाचाराच्या प्रकरणात राजकारण्यांच्या अटकेला अनेकदा राजकीय रंग दिला जातो. पक्ष आणि विरोधी पक्ष आपापसात विभागलेले दिसतात. साहजिकच, यामुळे सामान्य लोकांमध्ये भ—ष्टाचाराबाबत संभ—म निर्माण होतो आणि कोणताही विश्वासार्ह लढा पुढे सरकू शकत नाही. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेमुळे असेच वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी हे सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

वास्तविक, आंध— प्रदेशच्या राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने नायडू यांना ताब्यात घेण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेला गैरव्यवहार हे आहे. 2014 ते 2019 या काळात आंध— प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे सरकार असताना एका योजनेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. तांत्रिक कौशल्य विकास केंद्राची स्थापना करताना निधीचा कथित गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन काळात राज्य सरकारने काही खासगी संस्थांशी करार केला होता आणि त्यानुसार कौशल्य विकास कार्यक्रमासाठी निधीतील 90 टक्के खर्च वहन करायचा होता, तर दहा टक्के खर्च सरकार उचलणार होते; मात्र खासगी संस्थांनी कराराचे उल्लंघन केले आणि 371 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केला. या प्रकरणातील सत्य न्यायालयीन तपासातून समोर येईलच; मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर चंद्राबाबू यांना अटक करणे यावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. कारण, नायडू राज्यातील सत्तेत परतण्यासाठी मेहनत घेत होते.

चंद्राबाबू यांची बस यात्रा आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश याची 4 हजार किलोमीटरची पदयात्रा यामुळे टीडीपीला अनुकूल वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सत्ताधारी वायएसआर पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. चंद्राबाबू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून ही कारवाई राजकीय भावनेतूनच करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चंद्राबाबू गेल्या काही काळापासून जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात आक्रमकपणे निदर्शने करत होते. त्यामुळे बदला घेण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे.

2012 मध्ये याच चंद्राबाबूंच्या काळात जगनमोहन यांना अटक झाली होती. 16 महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगून ते बाहेर आले होते. आता फासे पलटले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून चंद्राबाबू यांची भाजपशी जवळीक वाढली होती आणि त्यामुळे ही राजकीय घडामोड जगनमोहन यांना अस्वस्थ करणारी ठरत होती. जगनमोहन यांच्याकडे राज्यातील 25 पैकी 19 खासदार असून, राज्यावरील त्यांची पकड लक्षात घेता जनाधार गमावलेल्या चंद्राबाबू यांना व्यवहारी भाजप किती जवळ करणार, असा प्रश्न आहे. चंद्राबाबू यांना अटक करण्यामागे राजकीय हेतू असला आणि अशा घटनांची दक्षिण भारतात प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. खुद्द चंद्राबाबू यांच्या कार्यकाळातही विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही कारवाई झालेली आहे. भ—ष्टाचाराविरोधातील कोणतीही कारवाई सत्ताधार्‍यांकडून केलेली सूडबुद्धी म्हणून चित्रित करून वास्तवावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होण्याची ही पहिलीच घटना नाही.

SCROLL FOR NEXT