सलमान : भाऊ, अभी एक मई आ रहा है! मेरा रोल कैसा रहा फिल्म मे रितेश?
रितेश : भाई, अच्छाही है. भला आपको कोई क्या बोले?
सलमान : क्या बोले? काय बोलला भाऊ?
रितेश : काय नाही, काय नाही. ठीक ठीक. अच्छा काम हुआ है.
सलमान : असं तर नाही, तू झुठी तारीफ करत आहे?
रितेश : नाही भाऊ.
सलमान : मग ठीक आहे.
रितेश : जीवाचा रोल तसा टफ होता भाऊ; पण तुम्ही छान निभावलात. गुड लक.
सलमान : (सेटवर रितेशला आलिंगन देत शाही पोशाखात) थँक्यू, थँक्यू भाऊ. कसा मी? छान दिसतो ना?
रितेश : खरं सांगू का?
सलमान : अरे सांग सांग. बिनधास्त.
रितेश : भाई, सुपर से भी उपर.
सलमान : (घाम टिपत) अरे तुने तो डरा दिया. (रितेशच्या पाठीवर हात मारत)
रितेश : अरे नाही भाई, जोरदार काम झाले जीवाचे. 1 मेला हंगामा आहे थिएटरमध्ये.
सलमान : नक्की पडणार. खरं तर मला तुझा रोल मिळाला असता तर हंगामा होता.
रितेश : तो तर झालाच असता.
सलमान : खरं बोलतोस का?.
रितेश : भाई, माझी खेचली असती सगळ्यांनी, खरं बोलतो यावेळी.
सलमान : खरंय. ज्याचे काम त्यानेच करावं. माझा मराठीचा प्रॉब्लेम होतो मदी मदी.
रितेश : नाही भाई, मदी जे फायरिंग झाले आपल्या बिल्डिंगवर ते माझ्यावर व्हायचं.
सलमान : ओ. लॉरेन्सला घाबरला का तू? मी नाही घाबरत.
रितेश : मला बडा साबची पण भीती वाटते. कोण पंगा घेणार. मराठा फिव्हर आहे आपल्याला.
सलमान : अरे मराठा ना तू. बडा साबला पण आपण नाही घाबरत. कारण, बडा साब माझ्या वाटेला जातच नाही.
रितेश : कसं काय भाऊ?
सलमान : खरं तर लॉरेन्स कोण आहे हे मला पण माहीत नाही; पण बडा साब गाफील आहे त्यामुळे.
रितेश : मला हे समजलंच नाही.
सलमान : मग तुला तुझी भूमिका ही समजली नाही या फिल्मची. काय भाऊ. घाबरतो काय. तलवार उचलणं सोपं आहे; पण चालवणं अवघड असं झालंय तुझं.