मोटू : (दिल्लीच्या रस्त्यावरून आलिशान गाडीतून डोकावत) झाडूवाले झाडू कितने को दिया? वो हॅरी पॉटरवाला लंबा वाला!
पतलू : तो विकण्यासाठी नाही. या झाडूमुळे माझी ओळख निर्माण झाली. मी आता पक्षात असलो, तरी झाडून सगळे आपल्या पक्षात आले, याची आठवण म्हणून मी आपला पदपथ साफ करत आहे.
मोटू : तू तो... हा नाहीस ना? बारीकसा किडमिड्या. राघवला आमच्याकडे येण्यास भरीस पाडला तो आपला हा! झाडूवाला आम आदमी पक्षी.
पतलू : हा मीच तो. मला ओळखले नाही?
मोटू : ही शक्यता डोक्यात होती. तुमच्या बाबतीत पण नेमके समोर याल, हे अपेक्षित नव्हते. खी...खी.. ख्याक (हसू दाबत)
पतलू : हसा. मुद्दाम ओळखत नसल्याचे नाटक हे आम्ही विधानभवनात पण अनुभवले. हसा. राघवला आपल्या पक्ष्याच्या पिंजर्यात ठेवून छान बोलायला शिकवलेत. त्याने जाताना आमचे सात पक्षी नेले. सोबत तेवढे परत द्या. नाही तर आम्ही डायरेक्ट पंजाबात जातो आणि एक मोठं कोंबडं मिळतंय ते पाळतो.
मोटू : तुम्हाला पक्ष म्हणजे पिंजर्यातली कबुतरे उडविण्याचं काम वाटते का? पक्ष नका चालवू. या हातातल्या चिन्हाचा टॅटू काढा मनगटावर. बिनकामी शस्त्र आणि शास्त्र शिकवता. उगाच आम आदमी म्हणून मिरवता. खरे तर, मॉक झाडूवाला म्हणायला पाहिजे तुम्हाला.
पतलू : आपल्याकडे सगळे मोक्यावर काम होते. ते मॉक बीक तुम्ही जाणो.
मोटू : बरे. तू नथि तो थारो फोटो भी चालसे...! आम आदमीच्या वतीने आता आपल्याला कोणीच कोणत्या कार्यक्रमात बोलावत नाहीत आपले नेते. तुमचा फोटो लावतात आणि सांगतात साहेब बिझी असल्यामुळे आपण त्यांना फोटोरूपात उपस्थित समजू. खी... खी... (हसून)
पतलू : ही आमची (दोन्ही अर्थी, पक्ष आणि स्वतः आम माणूस) खिल्ली उडवत आहात आपण.
मोटू : थारे पास किल्ली भी नथी. पक्षी स्वतः उडून जाते पिंजर्यातून. किल्लीची वार्ता करते काय तू. चल बस गाडीमद्दी. बीच रस्ते मत खडा रह. कोणी पक्षी नाही आणून देणार तुझे. तुला नवीन पिंजरा आणि नवीन पक्षी देतो.
पतलू : त्यापेक्षा आमचे पक्षी परत द्या. सरकारचे धोरण परवडणारे नाही. आम्ही आम आदमी आहोत.
मोटू : आम म्हणत तुम्ही आपची वाट लावली. वाटेतून बाजूला व्हा. तुमचे मुखवटे तुम्हास लखलाभ! झाडून जाऊदे. (द्विअर्थी बोलत मोटूभाई गाडीचा दरवाजा जोरात लावून निघून जातात.)