पहिला चहा | राम नाम जप...  
संपादकीय

पहिला चहा | राम नाम जप...

पुढारी वृत्तसेवा

सेनाप्रमुखांचे दोन भाषणांतील अंतर माईलस्टोन नसल्याने कोणत्या गावास जावे, हेच खासदारांना न समजल्याने ते रस्ता चुकले असावेत की काय? अरेरे...

उधमजी : (चार किंवा अधिक वर्षांपूर्वी) हिंदुत्व लाभणं आणि त्याचं नेतृत्व करणं इतकं सोपं नाही. त्यासाठी ते रक्तात असावं लागतं. आम्हाला ते वारसा म्हणून लाभले हे आमचे भाग्यच म्हणायचे. त्यामुळे आम्ही कशातही लगेच मिसळून जाऊ, तरीही हिंदूच म्हणवून घेऊ असे आमचे आम्हालाच वाटते. रामरक्षा आणि हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू. कशाला वाचायची हनुमान चालिसा आणि रामरक्षा! फक्त हिंदू आहे म्हणून सांगण्यासाठी का? आम्ही हिंदू आहोत; पण आम्ही कुठे वाचतो रामरक्षा? आम्हाला हिंदूच नाही, तर इतर धर्माला साथही दिली पाहिजे. कारण, आम्ही पक्ष अधिक मजबूत करण्याचे धोरण आखत आहोत.

बाळासाहेब : (काल्पनिक भाषण) आम्ही हिंदू आहोत आणि आजन्म हिंदूच राहणार. परप्रांतीयांची बाजू आम्ही कधीच घेणार नाही. बाजू घेणाऱ्याला सेना कधीही स्वीकारणार नाही. ते आमचे दूरचेही कोणी नातेवाईक लागत नाहीत, हे आम्ही आताच घोषित करतो. त्यांनी सेना सोडून इतर पक्षांत जावे आणि दुसरा धर्म स्वीकारावा. ते आमचे कोणीच नाहीत. कारण, आपले हे आपल्यालाच साथ देतात. जे जिकडे वळतील ते त्यांचेच समजावे. हिंदूंनी पाठ राखावी. पाठीत खंजीर खुपसून पक्ष सांभाळत बसू नये. पक्षात गटबाजी करून पक्ष ऐराव(ऊ)त हत्तीवर बसून हाकू नये. त्या हत्तीची सोंड घड्याळाकडे आहे, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे पक्षाचा पार बोभाटा झाला. आता तरी बस करावे. राम राम... शिव शिव...

उधमजी : (सध्या) आम्ही खुद्द बाळासाहेबांचे वंशज! कितीतरी लोक आमच्या विरोधात बोलत आहेत ते आमचे नव्हेत. हिंदूंची बाजू घेऊन लढत असले, तरी वारस म्हणून सेना आमचीच आहे. कितीही फाटे फुटले, तरी मूळ आम्ही घट्ट धरून ठेवले आहे. याचे कलम कुठेही दुसरा पक्ष स्थापून होणार नाही. दुसरी सेना ग्राह्य धरली जाणार नाही. ते हिंदू नव्हेत. राम नाम जप केल्यावर तरी समजेल आम्ही हिंदू आहोत. हनुमान चालिसापेक्षा मारुतीस्तोत्र म्हणावे का? की पुरोहिताकडून म्हणून घ्यावे? सत्ता वाचली पाहिजे, यासाठी रामरक्षा तातडीने वाचावी. आपण आपली रक्षा करू. राम नाम जपू! जय हिंद!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT