भारत दौरा हा परदेशी नेत्यांचं महत्त्वाचं आकर्षण. इथला पाहुणचार काय सांगावा. अगदीच भारावून टाकण्यासारखा! डिनर आणि लंचसाठी थांबणारे परदेशी पाहुणे मेनू आवर्जून विचारतात; पण त्यांची सौ तिकडे तो मेनू कदाचित सवडीने करतही असावी, ट्रायल बेसिसवर. चुकलीच एखादी पाककृती, तर त्याला फार तर पाककृत्य म्हणावे की काय, असे व्यंगात्मकदृष्ट्या म्हणायला हरकत नाही. कारण, पाकची कृष्णकृत्ये सांगावी तेवढी थोडीच. पुन्हा एकदा श्रीकृष्ण अवतार घेऊन प्रकट व्हावेत अशी परिस्थिती ओढवलीय. सर्व परदेशी नेते एकमेकांची गळाभेट घेत परदेशी दौरे आखत आहेत; पण आखाती युद्धाला काही विराम मिळेना. सध्या शी भारतात येऊन गेले, जीनपिंग हो. त्यांचं नाव शी आहे, यात भारतीय मर्म कृपया शोधू नये वाचक हो! तिकडे शी म्हणजे श्री वगैरे असावं असं समजू. शी नी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत डिनर न करताच मायदेशी प्रस्थान केले. निरोपाच्या वेळी त्यांचं असं बोलणं झालं असावं कदाचित..!
शी : ओके. आय हॅव टू लिव्ह. सॉरी फॉर द डिनर!
नेते : (भारतीय) ओके. नेक्स्ट टाईम वी विल गो फॉर ट्रेडिशनल मिल. रस्सा, मटण, भाकरी ऑर पुरण पोळी अँड ऑल ट्राय करू.
शी : प्लीज, सेंड मी युअर मेनू ऑन व्हॉटस्ॲप. वी विल ट्राय फॉर इट.
नेते : शुअर. पण, ते मेनू आमच्याकडेच चांगले बनू शकतात.
शी : (जरा नाराजीत) आमच्याकडे का नाही बनणार? तुम्ही आम्हाला याबाबतीत सपोर्ट नाही का करू शकत? देअर आर सो मेनी चायनिज रेस्टॉरंटस् इन इंडिया.
नेते : हो खरंय; पण तुम्ही तुमचे खाद्यपदार्थ जेवढे उत्कृष्टरीत्या बनवू शकता तसे इकडे बनत नसावेत. तसंच आहे.
शी : इंडियामध्ये आम्ही चायनीज खाल्ले आहे. टू नाईस. तसंच आम्हीही बनवू. रादर इंडियन फूड मिळतं तिकडे.
नेते : सगळा जांगडगुत्ताच असणार तिकडे. हे हे..
शी : म्हणजे डिश आहे का ती इंडियन? नाईस नेम. पण, आता आम्ही तिकडे जाऊनच इंडियन फूड बेटर कसे बनेल, यावर फोकस करू. व्हेन यू मीट चायना, यू विल गेट फूड ऑफ युअर टेस्ट लाईक व्हॉट यू से?
नेते : जांगडगुत्ता..!
शी : येस. नाव लेट मी गो. मला त्यासाठी तातडीने गेले पाहिजे. गुड बाय, टेक केअर. बी रेडी फॉर जांगडगुत्ता... हा हा..!
नेते : गुड बाय. हे हे... शुअर. टेक केअर! (सगळा जांगडगुत्ता झाला.)