पहिला चहा | पॉवर फुल्ल 
संपादकीय

पहिला चहा | पॉवर फुल्ल

पुढारी वृत्तसेवा

राम राम पाव्हणं! आत्ताच बोभाटाकडून हालहवाल ऐकून विधान भवनात फिरून आलो. मी मनोगत ऐकणारे मशिन आहे. माझं मनोगत इथे सांगतो. कोण काय विचार करतो ते बघा बुवा तुम्हीच जनहो! थोडक्यात सांगतो. ऐकाss...!

तर राम राम म्हटलं की रामायण आठवलंच पाहिजे. राम आणि त्याचा सोशिक स्वभाव हे आठवून एकाने बंगल्यातच वनवास स्वीकारला आणि एकले पक्षात राहून पक्ष राखण्यास सज्ज झाले. ना खांद्यावर धनुष्य ना बाणाचा संबंध. तरीही जुगलबंदी करायला निघाले बापडे. नाही आले कोणी तरी आम्ही असेच बडबड करू आणि गडबड करू. उगा लगबग आणि धावपळ करून आंदोलन करून रामास साकडे घालू. मग बघूच पक्ष उभा राहात नाही कसा? वनवासातले दिवस आमचेही संपतील म्हणतात. इकडे पवार साहेब वादाखातर विधान भवनात घुसले. काहीतरी आगळीक करणार गड्या. जाऊदे कोणी विचारावं? आघाडी आपलीच. या एकट्याशी बंधूंची भरत भेट कधी होईल आणि ते तोडीस तोड देतील राष्ट्रपित्यांना असं झालंय. हे विधान भवनातले आगमन म्हणजे आमच्या पादुका पण भरताच्या आधी घेऊन जातील हो ते असं वाटतंय. नकोच ती त्यांची भेट.

भरत बरोबर मनापासून युती करावी का? इकडे जावे की तिकडे जावे. आता हे विधान भवनात का उपस्थित झाले असावेत? आघाडी फोडणार बहुतेक. आत्तापर्यंतचे अनुभव हो! असे काहीसे विचार त्या फुटलेल्या सेनाप्रमुखांच्या डोक्यात घोळत राहतात आणि मग रक्षणासाठी वाद विवाद आणि आंदोलनं छेडतात. आता आहातच ना बंगल्यावर सुरक्षित म्हणतो मी! तिथेच राम भेटावा आपणास, ते सोयीस्कर. भरत भेटही झालीच असती. आंदोलनं करून राम आंदोलनात सहभागी होतील याची आशाच का धरावी. रामास पवित्र मंदिर आणि शांत नदीकाठी राहू द्यावे अंमळ. राम म्हणतात नकोत हेवेदावे आणि कटकटी. नकोत भेटीगाठी. आम्ही नाही कोणी पक्षश्रेष्ठी. नको ते राजकारण. ज्याला जसे हवे तसे भजावे परंतु रामरक्षेतच मी आहे हे डोक्यातून आधी काढून टाकावे. बघा. हेच म्हणणार होतो आम्ही. ते रामाने आत्ताच माझ्या कानाशी येऊन सांगितले म्हणून आपणापर्यंत पोहोचविले. काय म्हणावे यास? योगायोग की एकपात्री? एकटा जीव सोबतीला सदाशिव (राऊत). भरत (राज जी) शहाणपण शिकवून गेले. तरी हे तिथेच. यांच्या पादुका स्वतः यांना राम राम करून पळाल्या. आता विधान भवनात पॉवरफुल वारं शिरलं ते काय म्हणतात ते पाहून येतो. रजा द्यावी जनहो. राम राम!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT