आठवले : मला आठवले म्हणून मी नीट नाही वाचले, जे बोलले ते रट्टा मारून वाचले, म्हणून मधेमधे भाषण चुकले. मित्रहो, मीच आहे आठवले, अरे बापरे! सगळ्यांना भरले कापरे! (सभागृहात हंशा)
बिर्ला : (हसत) मुद्द्याचं बोला.
आठवले : साहेब, बोलू द्या, बोलू द्या, आमचं चिन्ह येऊ द्या. तसं आमचंच सरकार आहे. कारण, जिथे सरकार, तिथे आम्ही आहे! कोणीही परप्रांतात जावो, शेवटी इथेच भाकरीसाठी पुन्हा येणार आहे. (सभागृहात वाहवा) अमेरिका से आया जो चुपकेचुपके, वो है अभिजित दीपके. फार छान पोरगं आहे. आम्हास समधर्मी; पण म्हणून काय झाले. आम्ही तर कमळ स्वीकारले. नेते एकमेकांना देतात बुके, नेते एकमेकांना देतात बुके मी माझ्यासाठी कमळ बूक केले. आम्हाला नको बुके.
बिर्ला : बिलाबद्दल बोला. (हसू लपवत)
आठवले : राहुल राहुल..!
राहुल : येस प्लीज?
आठवले : विसरले पुढचे. मी काव्य करतोय. बसा बसा.
राहुल : ओह! कन्टिन्यू!
आठवले : राहुल आमचे होते खास, आता वाटतोय भास, चला चला बिल करा पास. राहुल बघा हसतात; हसताना खळ्या गालावर पडतात. मान झुकवली की अजून छान दिसतात. (हंशा)
राहुल : (मधेच) वो तो आप सीनिअर है, इस्लिए झुकना पडता है.
आठवले : ओ हो! झुकना तो पडेगा, नहीं तो काम बिगडेगा, ऐसे मत सोचना, हमारी इस कविता से मत बचना. उठके बाहेर मत जाना, पुरा सुनो गाना. (पुन्हा हंशा).
राहुल : येस. कन्टिन्यू.
आठवले : आम्हाला कोणीच नाही सुचवले, जस्ट आठवले. म्हणून आपणास सुचविले. विद्यार्थ्यांचे आपण खूप समर्थन केले; म्हणून बिल पास केले.
राहुल : धन्यवाद! इतनी तारीफ की उम्मीद नहीं थी आपसे, हमे आशीर्वाद मिलेगा तो सब ठीक हो जायेगा.
आठवले : आशीर्वाद है आटे का नाम, हमारे पास नहीं आटा. सबको बाय बाय टाटा. पोलिसांनी दाखवली काठी, पंचाईत केली विद्यार्थ्यांची मोठी. आम्ही नाही करत समर्थन त्यासाठी.
बिर्ला : आपली वेळ संपली बसा.
आठवले : शाळा सुटली, पाटी फुटली. विद्यार्थ्यांची माथी फुटली. पोलिसांना कळकळ कसली! ते म्हणतात, आता माझी सटकली! (बिर्ला बेल वाजवतात)...
आता आमची वेळ संपली...