पहिला चहा | चरित्रे त्यांची पाहा जरा...  
संपादकीय

पहिला चहा | चरित्रे त्यांची पाहा जरा...

पुढारी वृत्तसेवा

राहुल: माँ, शाळेत असताना एक कविता शिकलो होतो...

थोर महात्मे होऊन गेले,

चरित्रे त्यांची पाहा जरा,

आपण त्यांच्या समान व्हावे,

हाच सापडे बोध खरा...

सोनिया माँ: छान बाळा! पण, चरित्रे वाचताना एक लक्षात ठेव. महान माणसांना काही लोकांनी विरोध केलेला असतो.

राहुल: माँ, 'जर्नी ऑफ लव्ह'मध्येही असे काही विरोधक असतीलच ना? एकेकाळी विदेशी म्हणणारे आज चरित्राचे चाहते झालेत! एका रात्रीत लाखभर प्रती खपल्या.

प्रियांका: कालपर्यंत ज्यांना मम्मीच्या नावाची ॲलर्जी होती, त्यांना आज मम्मीच्या चरित्राचा सुगंध येतोय!

सोनिया माँ : अगं, राजकारणात काही गोष्टी विसरायच्या असतात; पण कोण काय बोललं होतं, हे मात्र लक्षात ठेवायचं असतं.

राहुल : म्हणजे शरदरावांनी तुम्हाला विदेशी म्हटले, ते विसरायचे नाही?

सोनिया माँ : नाही बाळा. पण आता ते स्वतःच त्यांच्या पक्षात एका गटासाठी परके झालेत. काळ कसा बदलतो पाहिलंस?

प्रियांका: राजकारणात कुणाला कायमचं घराबाहेर काढू नये. उद्या त्याच्यासोबतच व्यासपीठ शेअर करावं लागलं तर?

राहुल: पण माँ, ज्यांनी तुमच्यावर टीका केली, तेच स्तुती करत असतील, तर

सोनिया माँ: त्यांची गरज समजून घ्यायची!

प्रियांका: परवा मोर्चात सुप्रियाताई माझ्यासोबत छान बोलत होत्या.

पुत्र राहुल: तू पंतप्रधानपदाची संधी नाकारलीत.

सोनिया माँ: हो बाळा. काही पदं नाकारल्यावर जास्त मोठी होतात!

प्रियांका : आणि काही पदं मिळवण्यासाठी आधी पक्ष फोडावा लागतो!

राहुल : ज्यांनी काल तुम्हाला विदेशी म्हटलं, ते आज तुमचं गुणगान गात असतील, तर त्यांना काय म्हणायचं?

सोनिया माँ : त्यांना काही म्हणायचं नाही. फक्त त्यांच्या जुन्या भाषणांच्या सीडी जपून ठेवायच्या!

राहुल : हे पटलं...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT