सोनिया मॉम राहुल ऊर्फ पप्पूबाळास राजकारणाची रेसिपी समजावत असताना बंगल्याबाहेर एक वाघीण आपल्या मानलेल्या पिल्लाला घेऊन प्रकटली.
राहुल बाळ : (बाहेर डोकावत) मॉम टायग्रेस ऑफ बेंगोल विथ हर सो कॉल्ड सन, आत बोलावू का त्यांना?
सोनिया मॉम : नको, आपणच बाहेर जाऊ.
राहुल बाळ : येस मॉम. मी दिवाणखान्यात आहे. तुम्ही तुमची बैठक कुठे घेता बघा.
मॉम : आम्ही आतमध्ये गुसलखान्यात बैठक घेऊ. आत बोलाव त्यांना.
बाळ : मी तेच म्हणत होतो.
मॉम : ओके ओके. नाऊ गो.
बाळ : येस मॉम. आपका हुकूम सर आँखों पर. (दिवाणखान्यात बंगालच्या बछड्याची चौकशी. ममता बॅन आत जात.) कसं काय येणं केलात?
बंगाली बछडा : (गुर्रर्र) ओमी शोगलीकडून फसलो भाई, आम्हाला कुठे थारा न्हाई.
बाळ : ‘ईडी’ आणि बाकी घोटाळे आम्ही या गोष्टीत लक्ष नाही घालत. बाकी ममता काकू आणि मॉम बसून मार्ग काढतील काय तो. आपण चहा घेणार की कॉफी?
बंगाली बछडा : पहिले मला लपवा. ‘ईडी’चे लोक शोधत आहेत. नंतर आपण बोलू सविस्तर. इथे कोण आलं चौकशीला तर सांगू नका आम्ही इथे आहोत. ‘ईडी’ उगाच लागलेत पाठीमागे.
बाळ : ओके. गवत खात असताना तुम्ही डरकाळ्या फोडत इथे आलात. आतापर्यंत समजलंच असेल विरोधी पक्षाला आणि ‘ईडी’लापण तुम्ही इथे आहात. आम्ही लपवले, असं व्हायला नको.
बंगाली बछडा : ते आमच्या ममता आत्या पाहून घेतील. (सोनिया मॉम, ममता बॅन बाहेर येत)
मॉम : या ममताबाईंचं तर रडणंच थांबेना.
ममता बॅन : हंबाsss.. हंबाss!
मॉम : असा हंबरडा फोडला तर आम्ही कसा मार्ग काढणार? यांचे फुटीर नेते एकेक करत सगळे फुटले. या एकट्या काय करणार पक्षात राहून?
बाळ : यांना ‘वनतारा’मध्ये सोडून येऊ का मॉम? यांच्या हंबरड्याला बाकी पक्षी, प्राणी दाद देतील.
मॉम : काय सल्ले देतोस मोलाचे! तू पण जा या दोघांसोबत. पक्ष सांभाळतात म्हणे. गेट लॉस्ट यू ऑल. (सोनियांचा राग पाहून सगळे पडद्याआड.)