पहिला चहा : पॅक पॅक पक्याक... 
संपादकीय

पहिला चहा : पॅक पॅक पक्याक...

पुढारी वृत्तसेवा

एक कोंबडं आरवत पाकिस्तानच्या बॉर्डरवर पोहोचलं. अजून का पहाट होत नाही? मी केव्हापासून ओरडतोय, आरवतोय, सूर्य उगवायचं नाव घेत नाही. काही कोंबड्यांना जाग आली की, को को को... करत खुराडं डोक्यावर घेतात. यानं पण खुराडं उड्या मारून मारून उघडलं आणि पळत सुटलं. शेवटी पाकिस्तान गाठलं. तिथे तारेचे कुंपण. शेवटी एका भारतीय सैनिकाने त्याला अडवलं आणि खुराड्यात डांबलं.

सैनिक : अबे तू कुठून शिरला इकडे? आपली बॉन्ड्री ओलांडतोय कशाला? तिकडे फुकट मरशील. गप खुराड्यात राहा.

कोंबडं : दादा मी कुठे आलोय?

सैनिक : तू काय आरवतोय हे माहीत नाही; पण कदाचित पत्ता विचारतोस असं दिसतं. तू पलीकडच्या बाजूने थेट इकडे घुसलास लेका. लांबून आलेला दिसतोस. पंजाबातून आहेस का? भली मोठी बांग देतोस म्हणून विचारले?

कोंबडं : हो हो हो... कुकुचकु... यां हुं!

सैनिक : तांबडं फुटायला आलं. आवाज नको करू. ही देशाची सीमा आहे. तू पाकिस्तानच्या बॉर्डरला तंगडं लावून परतला आहेस. सैनिक तुझी तंदुरी करतील.

कोंबडं : मी चिकन नाही. कोंबडी नाही मी. कडकनाथ आहे. जरा इज्जतीने बोला. को कोक..!

सैनिक : हा! कोक वगैरेची व्यवस्था आहे तिकडे. आपण शुद्ध शाकाहारी आहे. म्हणून वाचलास. नाहीतर काम झालंच होतं तुझं आज.

कोंबडं : मी इकडे आलोय सूर्याला शोधायला. तो आज उगवतच नव्हता. इकडे आल्यावर थोडं उजाडलं. कोक कोक...!

सैनिक : तू सूर्याकडे पाहून कोक कोक... नको करू. तो उगवणारच, तू कुठेही लपलास, धावलास तरी!

कोंबडं : (बॉर्डरच्या पलीकडे जातो.) कोक कोक... जरा लांब गेलो की उजाडेल. बॉर्डर तर तुमच्यासाठी आहे. आता पकड बघू. खुराड्यात कोंडून ठेवतो का मला?

पाकिस्तानी सैनिक : ओए, ये तो कडकनाथ है. पहली बार नजदीक से देखा. माशा अल्ला. ओए जा अपने घर. ओए. जा मुर्गे, यहाँ लॉकडाऊन हैं. हम खा नही सकते तुझे, बाहर इम्पोर्ट एक्सपोर्ट पे भी पाबंदी है. इसलिए हिंदुस्तानीयों ने तुझे हमें चिढाने के लिये भेजा है. जा यहाँ से. (हाकलून लावतो) ये साजिश है.

भारतीय सैनिक : इडियट कडकनाथ. लॉकडाऊनमुळे वाचलस लेका. जा खुराड्यात... (कोंबड्याला खुराड्यात कोंबतो) पॅक पॅक पक्याक्क. (कोंबड्याची मिमिक्री करत) पाक डाव झाला असता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT