पहिला चहा | नाथ आणि पंत  
संपादकीय

पहिला चहा | नाथ आणि पंत

पुढारी वृत्तसेवा

नाथ आणि पंत एका नाण्याच्या दोन बाजू. टॉस केल्यावर दोन गट झाले. नंतर पंतांचे आमदार, खासदार फुटले आणि नाणे भलतीकडेच जाऊन उभा राहिले. टॉस जिंकण्याचा प्रश्न उरला नाही. एक बाजू नेस्कोच्या दिशेला आणि दुसरी षण्मुखानंदाकडे. दोघांची पाठ एकमेकांकडे. यांचे भाषण चालू झाले. थोडक्यात, या कानाची त्या कानाला मीडियामुळे खबरबात जात होती आणि तानाशाही (टोमणेबाजी) चालू झाली.

नाथ : अंधेरी नगरी चौपट राजा. देवा काय उपहास, काय ते लेक्चर. आली अंगाशी घेतली शिंगाशी.

पंत : दाढीवाला आला कुणी नाही पहिला.

नाथ : तुम्ही डोके लढवा. आडात नाही ते कोहळ्यात कुठून येणार? पण आम्ही...

पंत : खास लोक नेले आमचे; पण आम खाऊ देणार नाही.

नाथ : हमे आम खानेसे मतलब. गुठलीया आप गीनो!

पंत : भावाला मनातले सगळे सांगितले. आता पुढे काय वाढून ठेवले तेच खावे, असा निरोप दिलाय. बाकी आमबिम नंतर बघू काय ते!

नाथ : शहेनशहा हमारे पास है, तो डरना कैसा? आम्हास भीती ना कुणाची. चिडवून रडणारे तरी आम्ही नाही.

पंत : आपले शहेनशाह नमो म्हणत देवीस साकडे घालून आले, तरी ते पद नमो देणार कसे? उगाच नको ते खटाटोप.

नाथ : शहेनशहा काय करतील त्यांचे त्यांच्यापाशी. हा नाथ शेवटी त्या सहा अनाथांचा नाथ आहे.

पंत : ते अनाथ नाहीत. फंड नाही म्हणून घबाडकुंड शोधायला बाहेर पडलेत. येतील फिरून. जातात कुठे?

नाथ : आपण कमरेवरचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला असता, तर ते सोडून गेले असते का?

पंत : येतील पुन्हा. 'मातोश्री'वर खडा‌न्‌ खडा बातमी पोहोचतेय.

नाथ : पक्षाला खिंड पडलीय ती आधी बुजवावी पंतांनी.

पंत : आम्ही शर्थीची खिंड लढू; पण 'मातोश्री'वरची आमराई आबाद ठेवू.

नाथ : अहो आंब्यांचा सिझन संपला. भानावर या. पावसाळी अधिवेशनात आंबे विकणार का?

पंत : चुकलेच आमचे. लोकांची निवड चुकते कधीतरी!

नाथ : कबूल केलात की पटकन. पंत आम्ही आंब्याची बागही घेऊ. 'मातोश्री'वर जाणे-येणे चालू ठेवू अप्रत्यक्षात.

पंत : अजून कोण सामील होतील आपणास ही देवाची मर्जी; पण आम्ही आमची आमराई जपू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT