पहिला चहा | पिंडे पिंडे मतीर्भीन्न..! 
संपादकीय

पहिला चहा | पिंडे पिंडे मतीर्भीन्न..!

पुढारी वृत्तसेवा

जॉन : ओ गॉड. सेव्ह मी.

शाम : का रं बाला. काय झालं?

जॉन : मला नारळाच्या झाडावर चढायचंय. प्लीज हेल्प.

शाम : काय काम हाय तीकरं?

जॉन : स्वावलंबन. नारळ हवे आहेत मला. बाकी काही नाही.

शाम : मॅड झालास का? ते तुझं काम नाही.

जॉन : मग कोणाचं? आपण आपलं काम करावं.

शाम : मग कर. तुझा तूच वरती चढ की वसाड्या.

जॉन : मी बघतो काय ते. तू जा. माझा पतंग अडकला आहे वरती, तो हवा आहे.

शाम : किती उठाठेव्या रं तुज्या बाला? पतंगासाठी तू पतंग व्हायला निंगालास? जाशील ना उडून वरच्या वर. पाप्याचं पितरं. उतार खाली.

जॉन : जा ना तू. मी माझं बघून घेईन. (वरती चढू लागतो)

शाम : दुसरा पतंग नाय मिलत बाजारात?

जॉन : मी हाच पतंग काढून देईन म्हणून पोरांना चॅलेंज देऊन आलोय. (चार-पाच पोरं झाडाजवळ येत गलका करतात)

मुलगा : जॉन दादा, काढलास का पतंग?

जॉन : (शामकडे बोट) हा काढू देत नाही.

मुलं : शाम काका आमचं काम आम्हाला करू द्या. जा इकडून.

शाम : मरा तिकडं! (जॉन खाली पडतो)

जॉन : ओ माय गॉड. वेट. मी काढून देतो. थोडं थांबा.

मुलगा : जॉन दादा, राहुदे. ते तुमचं कामच नाही. (तिकडून समुद्र किनारी फिरायला एक मराठी बाण्याचे सद्‌ग्रहस्थ अवतरतात)

सद्‌ग्रहस्थ : हे काय चालू आहे, तुमचे? मी पाहतोय बराच वेळ लांबून. पतंग काढताय का?

जॉन : हो. मग काय करायचंय तुम्हाला?

शाम : तो त्या पतंगाशी झुंजतोय आपण नको लक्ष द्यायला. पोरं पण किती बावली हायेत. याच्या नादी लागलीत. याला पतंग करून उडवला असता तरी चाललं असतं! (मुलं हसतात.)

मुलगा : ओ काका तुम्ही काढून द्या ना..

सद्‌ग्रहस्थ : थांबा त्यासाठी विवेकाचा मांजा शोधतो. कुठे बरं आहे मांजा. हा..तो बघा तिकडे बाजूलाच आहे. ओढा.

जॉन : ओढा काय ओढा. पतंग फाटेल ना. मी नसतं का केलं ते.

सद्‌ग्रहस्थ : पतंग हवेत आहे. मांजा फक्त या झाडाच्या खाली दगडात अडकला आहे. (तो ओढत पतंग खेचतात आणि देतात)

जॉन : ऑ. भारीच तुम्ही. थँक्यू. खूप हुशार निघालात हो?

सद्‌ग्रहस्थ : पिंडे पिंडे मतीर्भीन्न! विवेकाचा मांजा सापडला पाहिजे. पतंगासोबत हवेत उडायला. हा हा हा...! पोरांनो उडवा रे पतंग....!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT