फॅन १ : यन्ना रास्कला... माईंड इट! अण्णाचा नवा पिक्चर आलाय थिएटरमध्ये...
फॅन २: अण्णा बोले तो..
फॅन १ : अबे, अण्णा... अण्णा... रजनीअण्णा... रजनीकांत... महानायक,
द बॉस, थलैवा!
फॅन २ : सॉरी, सॉरी... (दोन्ही कानांना हात लावतो) रजनीअण्णा सुपर...
फॅन १ : भावा, क्रिकेटपटू संजू सॅमसनदेखील आपल्यासारखाच थलैवाचा मोठा फॅन निघाला..
फॅन २ : होय? काय केलंय नेमकं त्यानं...
फॅन १ : आपण कसं थलैवाची मोठमोठी पोस्टर्स, कटआऊटस् उभारतो.. त्याला दुधाचा अभिषेक घालतो, मोठमोठ्या हारांच्या माळा घालतो... थिएटरमध्ये एंट्रीवर जल्लोष करतो... संजूही तसाच...
फॅन २ : थलैवाचा आणखी एक फॅन....
फॅन १ : रजनीकांतच्या ‘जेलर २’ साठी संजूने अख्खं थिएटर बुक केलं होतं!
फॅन २ : अख्खं थिएटर? नक्की सिनेमा बघणारेय की थिएटरचा मालक बनणार आहे?
फॅन १ : त्याला थलैवाचा पिक्चर एकट्याने नाही, तर कुटुंबीय, मित्र आणि टीममधल्या सहकाऱ्यांसोबत बघायचा होता!
फॅन २ : हा तर थलैवाचा जबरा फॅन निघाला...
फॅन १ : पण, रजनीकांतची क्रेझच तशी आहे रे! त्याची एंट्री म्हणजे थिएटरमध्ये भूकंप, आणि त्याने चष्मा फिरवला की त्सुनामी!
फॅन २ : नाहीतरं काय... जबरदस्त.. आपण जायचं का पुन्हा...
फॅन १ : रीलिजच्या दिवशी संजूला चित्रपट पाहता आला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने हा खास शो बुक केला.
फॅन २: याला म्हणतात डेडिकेशन! आपण आवडता सिनेमा चुकला तर ओटीटीवर येण्याची वाट बघतो. ओटीटी ठीक आहे; पण थलैवाचा ऑरा हा मोठ्या पडद्यावरच अनुभवायचा असतो!
फॅन १ : रजनीकांत यांना कळलंय का की संजूने अख्खं थिएटर बुक केलंय ते?
फॅन २ : आज ना उद्या कळेलच की... मग थलैवा फक्त चष्मा फिरवेल आणि म्हणेल, ‘संजू… सु...प्पर!’
फॅन १: बस्स! आणि त्या एका शब्दासाठी संजू आणखी एकदा शो बुक करू शकतो हा...
फॅन २: क्रिकेटमध्ये संजू सॅमसन विकेटच्या मागे असतो… पण, रजनीकांतच्या बाबतीत त्याचं हृदयच क्लीन बोल्ड झालंय!
फॅन १ : फॅनगिरी अनलिमिटेड! संजू भाई, तू थिएटर बुक नाही केलंस, तू फॅनडमचा नवा बेंचमार्क सेट केलास!