इराण आणि रशिया फोन कॉलवर व्यस्त आणि एक पुसटशी शक्यता घेऊन रशिया इराणला सतर्कतेचा इशारा देतो! पाहूया पुढे काय घोळ घालतो इराण आणि ट्रम्प!
इराण : तो ट्रम्प काल भाषणात काहीतरी बोलून गेला. खूश होता.
रशिया : तो थोबड उचकटूनच असतो नेहमी. नेमके काय झालं?
इराण : काल तो बोलला आम्ही काय आहे ते दाखवून देऊ. इथे तिथे सगळीकडे आम्हीच असू. हे काय होतं समजलं नाही.
रशिया : तो सगळीकडे आजकाल भुतासारखा फिरतो. कधी मेलनीवर पाळत ठेवतो कधी तुमच्यावर. मिस्टर इंडिया समजतो तो.
इराण : तो अमेरिकन आहे. इंडियाशी त्याचं नातं स्ट्राँग नाही. सरड्याची चाल खेळतो तो.
रशिया : मिस्टर इंडिया म्हणजे मूवी मधला. लेस नॉलेज कॅन बी डेंजरस. बी केअरफुल.
इराण : आम्ही नाही पाहात मूवी.
रशिया : मिस्टर इंडिया म्हणजे तो कुठे गायब होतो यावर अभ्यास करा. समजेल.
इराण : त्याची स्माईल विचित्र आहे, हायना (प्राणी) पण लाजेल. कितीही करार करा. मागे जातो, पुन्हा येऊन मानेवर बसतो. हायना कुठचा.
रशिया : हा हा... हो ना! गुड सेन्स ऑफ ह्युमर. पण ट्रम्प इराणला लागलेला ट्यूमर आहे. हायना का बायना घेतल्याबिगर जाईना, असा आहे तो. पाण्याखाली पण लपेल.
इराण : यू मीन टू से... अंडरवॉटर?
रशिया : यप... राईट.
इराण : काल रात्री गस्त घालताना पाण्यातून विचित्र हालचाली जाणवल्या. अहो, पाण्यावर नारळाची झावळी तरंगत होती. मला थोडा वेळ वाटलं ट्रम्प पाण्याखालून चालला आणि विग वरती राहिला की काय?
रशिया : जरा डोकं चालवा कधीतरी उलटं. त्याची उलटी खोपडी आहे. तो कसा दिसेल तुम्हाला? त्याच्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे.
इराण : तोच यंत्रमानव आहे की काय याचा शोध लावला पाहिजे. हसतो रोबोसारखा.
रशिया : अहो, तुम्ही त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा. तो एक कटाचा भाग आहे. इटस् ऑल फेक. तुम्ही आत्ता कुठे आहात?
इराण : नियर वॉटर. काही सुचवायचं आहे?
रशिया : आम्हालाच सुचवावं लागतं. ऐका. अंडरवॉटर ड्रोन असू शकते. चेक करा.
इराण : म्हणजे तो ड्रोन होता?
रशिया : कुठे?…
इराण : पाण्यात काहीतरी असल्याचा भास झाला. मी काल बॅरल समजून घरी नेला.
रशिया : वाह, यालाच म्हणतात ट्रम्पची करणी ड्रोनमधे पाणी... इटस् अंडरवॉटर ड्रोन रास्कल्स. खुद भी मरेगा, मुझको भी मरवायेगा क्या. विल्हेवाट लावा. लवकरात लवकर. हरी अप...!