ऑफिसर : साहेब, डेटा इज मिसिंग. डेटा चोरीला गेला. प्रकल्पाच्या सुरक्षेला धोका.
सिनिअर : ओह! सायबर क्राईम. कॉल द पुलिस.
ऑफिसर : पोलिस कम्प्लेंट केलीय सर. सायबर पोलिस शोध घेतील. त्यांचा पण पोलिस स्टेशनमधील डेटा चोरीला गेला. त्या गडबडीत आहेत ते.
सिनिअर : ओ गॉड. रास्कल. मग आता ते काय सुरक्षा करणार आपली?
ऑफिसर : सर, त्यांनी सीबीआयला कळवायला सांगितले.
सिनिअर : तिथे कोण ऑफिसर ओळखीचे आहेत?
ऑफिसर : सर सिंघम. त्यांचा कॉल झाला. त्यांच्या घरातला खांब कोसळला. ते कॉन्ट्रॅक्टरला शोधायला गेलेत.
सिनिअर : वाह! काय कॉन्टॅक्टस आहेत आपले! सायबर खात्यात डेटा चोरीला जातो, सिंघम खांबात अडकतो. यांना बोलावणार तुम्ही सायबर क्राईम शोधण्यासाठी?
ऑफिसर : एसीपी प्रद्युम्न उपलब्ध होतील. कॉल लावू का?
सिनिअर : (कपाळावर हात मारत) लावा.
ऑफिसर : हॅलो. हॅलो. सर मी बंबानी अँड बंबानी कंपनीतून युनिट ५ मधून बोलत आहे. तुम्ही इकडे येऊ शकता का? (तिकडून हॅलो म्हणत कॉल कट.) हॅलो. सर फोन कट केला त्यांनी.
सिनिअर : कट नसणार झाला. हवेत उडवला असेल हात फिरवत. करतील थोड्यावेळात. (पुन्हा रिंग होते) घ्या त्यांचाच असेल.
ऑफिसर : हॅलो ओके ओके. ते आलं लक्षात. फोन पडला का आपल्या हातून. सर इकडे येऊ शकता का?
प्रद्युम्न : (तिकडून) समजली बातमी आम्हाला. खूप मोठी टोळी आहे ती.
ऑफिसर : तुम्हाला संशय असेल तर माहिती देता का आम्हाला? इकडे आलात तर बरं होईल.
प्रद्युम्न : माझ्या हातात जरा मुंग्या येतायत. मी तरीही प्रयत्न करतो. (फोन कट).
ऑफिसर : (फोन ठेवत) सर त्यांच्या हातात मुंग्या येतायत. आता?
सिनिअर : गडबड हैं. दयाला कॉल जोडून द्या.
ऑफिसर : दया सर कालच हॉस्पिटलमध्ये भेटले. अंगठ्याचं नख उडाले त्यांच्या. प्रद्युम्न सरनी दरवाजाला लाथ घालून तोडण्याची ऑर्डर दिली. तो दरवाजा नव्हता. भिंतीला दरवाजाचं चित्र होतं सर.
सिनिअर : त्याच भिंतीवर तुमचं चित्र लावा. असे वर्कर असल्यावर डेटा काय नोटांची पण चोरी झाली असेल. चेक द लॉकर! (मिशन सुपडासाफ )