पहिला चहा | विजयी भव..! 
संपादकीय

पहिला चहा | विजयी भव..!

पुढारी वृत्तसेवा

एका सिनेमा अभिनेत्याचा कौटुंबिक वाद विकोपाला जातो. बराच काळ लोटतो, एक दिवस अभिनेत्याचे चित्रपटातून राजकारणाच्या पटावर पदार्पण होते. डायरेक्ट विजयच! एक दिवस कोर्टाची सुनावणी..!

न्यायाधीश : (तुरळक शांततेत व्यत्यय आणत सवयीप्रमाणे हातोडा आपटत) ऑर्डर ऑर्डर! पत्नीच्या वकिलांनी प्रश्न विचारावेत.

पत्नीचे वकील : (अभिनेत्याला) प्रश्न असा आहे की, मिस्टर अजय, आपण मंत्री झाल्यावर आपल्याला या घरगुती समस्येकडे कसे पाहावे वाटते?

अभिनेता : छान वाटते. आपला प्रश्न सुटला असं वाटतंय.

पत्नीचे वकील : (अभिनेत्याच्या कानाशी पुटपुटत) तेवढा खरच आमचा पण प्रश्न सोडवा की! आम्हाला न्यायाधीश व्हायचंय. नीट अभ्यास करतो; पण शिफारस लागेल ना!

अभिनेता : (वकिलांच्या कानाशी हळू आवाजात) फक्त अभ्यास करून आयक्यू समजत नाही. नीट तयारी करा प्रश्नांची!

विचारा.

पत्नीचे वकील : हा हा... तर मला असं म्हणायचंय मिस्टर अजय, आपण तयार आहात का समझोता करण्यासाठी. आमचे पक्षकार विनंतीवजा इशारा देत आहेत की, समेट झाला पाहिजे.

अभिनेता : मंजूर आहे; पण हा सिनेमा नाही. धिस इज रिअल कोर्ट. यापुढे पूर्व दिशा ही पूर्वच असणार आहे.

पत्नी : पूर्व दिशा उत्तरेला असेल, तरीही आम्हाला मान्य आहे. कारण, आपण मंत्री झालात. त्यामुळे सर्व दिशा सारख्याच वाटत आहेत.

अभिनेता : ठीक आहे; पण चित्रपट सोडला, तरी आम्ही डायलॉग सोडणार नाही. ते ऐकावे लागतील.

पत्नी : ते डायलॉग आता सर्वांना पाठ आहेत. सवय झालीय. चालेल.

अभिनेता : वकील साहेब, भाषण चांगलं पाठ करून घेतलात; पण आम्ही यांची जुनी भाषणं विसरलेलो नाही. ती आम्ही यापुढे ऐकून घेणार नाही. सांगा त्यांना.

अभिनेत्याचे वकील : (भांडणाची ऑडिओ रेकॉर्ड कोर्टमध्ये सादर करतात.) याच्याबद्दल बोलत होता ना?

पत्नी : हे पूर्वीचं निघणार असेल, तर आम्ही पूर्वीच्यासारखं वागू. सूर्यास्त झाला की, लोक आणि सूर्य पूर्वेकडे नाही, तर पश्चिमेकडे पाहतात.

अभिनेता : शब्दांच्या कोट्या बघा. आम्ही वाल्याचा वाल्मिकी झालो, तर आपल्याला वाली राहणार नाही.

न्यायाधीश : (हातोडा आपटत) जावा घरी. ही केस इथेच संपली. कोर्ट घरी भांडण्यास दोघांना परवानगी देत आहे. विजयी भव! (न्यायाधीश घाम टिपत निघून जातात.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT