पहिला चहा : दृश्यम अदृश्यम...! 
संपादकीय

पहिला चहा : दृश्यम अदृश्यम...!

पुढारी वृत्तसेवा

दृश्यम पाहून संभ्रमात परतलेले काही लोक स्मशानाच्या वाटेने रात्री बाराच्या सुमारास गाडीतून घरी परतत असताना गाडी स्मशानाजवळ बंद पडते. भयाण शांतता. तेवढ्यात एक मनुष्य रमणसमोर येतो. दार खटखटवतो.

मनुष्य : साहेब लिफ्ट हवीय .बराच वेळ वाहनांची वाट पाहिली. पण कोणी थांबेनात.

रमण : राम राम राम (पुटपुटत) तुम्ही आहे ना पण? म्हणजे तुम्ही आहात ना आमच्यासोबत. आपण जाऊ एकत्र हायवेपर्यंत. डोन्ट वरी. काय राधा?

राधा : कोणाशी बोलतोयस? बाधा बिधा झाली की काय तुला? तरी सांगत होते. इकडून यायला नको.

रमण : तुला नाही दिसला कोणी? राम राम राम. हा दृश्यमचा परिणाम आहे. बहुतेक स्मशानातले सगळे सांगााडे ॲक्टिवेट झालेत. काही खरं नाही. राम राम राम. गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं. पेट्रोल संपलं यातलं. कसं काय?

राधा : बापरे. मला जाम भीती वाटतेय. फोन करून बोलाव कोणाला तरी.

रमण : अगं रेंज नाही पकडत इकडे. देवा. वाचव रे. सर्वपित्रीमुळे चांगली तयार होऊन बिऊन बसलेत भुतं. चांगल्या पोशाखात फिरत आहेत हे सांगाडे.

राधा : अजून एकदा ट्राय करा. होईल गाडी चालू. इकडून निघूया.

रमण : नाही होणार चालू. पेट्रोल गिळलं बहुतेक त्या भूताने? ये... ती बघ पुढे भुतांची पालखी येतेय. राम राम राम. डोळे बंद कर. काही खरं नाही आपलं.

राधा : डोळे बंद केल्यावर अजून भीती वाटेल रे. राम राम राम.(सगळे समोर येऊन नाचू लागतात.)

शुक शुक.... दृश्यम पाहिला आम्ही. आमच्या गाडीत पाठीमागे बघ कोण आहे. अजय देवगण. अदृश्य आहे. तो तुम्हाला दिसणार नाही. तुमची विल्हेवाट लावेल हां तो. सस्पेन्स फुटणार पण नाही. हां. व्हा मागे. जा स्मशानात परत. भुतं कुठची.

भुतं : दृश्यम अदृश्यम... हे हे... कुठे आहेत देवगण? आम्ही मनुष्यगणाला दिसतो. देवगणाला नाही. हा हा हा. तुम्ही मनुष्यच आहात ना? ही ही हा हा...

राधा : ये जा निघून. आमच्याकडे पेट्रोल आहे. काडी लावून पेटवून देऊ. मग बसाल... रमण ते पेट्रोल टाक यांच्या अंगावर...

भुतं : अरे ये बाबांनो. आम्ही खरी भुतं नाही आहोत. इटस्‌ प्रँक. एन टी व्ही बकरा. तो बघा कॅमेरा. हा हा हा. मॅम पण सामील आहेत प्लॅनमध्ये. चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या काहीजणांचे नंबर्स आम्ही मागून घेतले मघाशी, काही लोकांना कल्पना देऊन. तुम्ही तर आम्हाला डायरेक्ट काडी लावायलाच निघालात.

रमण : (गाडीतून बाहेर येत) अरे ये. काय मस्करी ही? फिल्मचा पहिला दिवस म्हणून काही कराल का? धक्का द्या गाडीला. चला.

भुतं : (अर्थातच प्रँक वाली) आम्ही पेट्रोल काढून घेतलं होतं. घ्या ही बाटली. पेट्रोल आहे त्यात.

रमण : यात भूत बित नाही ना. नाहीतर या भुतांचा काही नियम वगैरे नसतो. बघू? पेट्रोलच आहे. थॅन्क्स. पण असले प्रँक करू नका. त्या देवगणने प्रँक केला तेवढा पुरे. हा हा हा....! (सगळे हसून निघून जातात. स्मशानात स्मशान शांतता.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT