Maharashtra Politics  Pudhari News Network
संपादकीय

Maharashtra politics: गटबाजी अन्‌‍ सत्तेची चढाओढ

काँग्रेसने चंद्रपुरातील वचपा भिवंडीत काढल्याची चर्चा आहे. नागपूर महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र उट्टलवार

काँग्रेसने चंद्रपुरातील वचपा भिवंडीत काढल्याची चर्चा आहे. नागपूर महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

चंद्रपूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग््रेासच्या वाट्याला जे आले तेच भिवंडीत भाजपच्या वाट्याला आले. चंद्रपूरमध्ये काँग््रेासची सत्ता येणार, हे अपेक्षित असताना भाजपचा महापौर निवडून आला. शिवसेना उबाठा गटाने महाविकास आघाडीऐवजी भाजपला साथ दिली. मातोश्रीने या बंडखोरीची गंभीर दखल घेतली, असे दाखविले खरे; मात्र पुढे काहीच न झाल्याने भाजप, शिवसेना परंपरागत मैत्रीची वीण अधिक घट्ट होण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. मुंबई मनपात भाजपला ‌‘वॉक ओव्हर‌’ दिला गेल्याने या शंकेला अधिक बळ मिळाले. चंद्रपूर काँग््रेासमधील दगाबाजीची चर्चा गल्ली ते दिल्ली झाली.

चंद्रपुरात ठरलेल्या गणिताला, दिलेल्या शब्दाला मित्रपक्ष जागला नाही. नेत्यांचा बेबनाव, समन्वयाचा अभाव यात काँग््रेासच्या हातून सत्ता गेली. काँग््रेासचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष मनपा निवडणुकीनंतरच्या घडामोडीत अधिक वाढला. धानोरकर यांनी वडेट्टीवारांवर पुन्हा निशाणा साधला. काँग््रेास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दखल घेतली; मात्र ते टिपू सुलतान वादात अडकल्याने ही कारवाई मागे पडली, असे दिसते. आता काँग््रेासने चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढला अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित सहा भाजप नगरसेवकांवर निलंबन आणि कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

नागपूरची तिजोरी कुणाकडे ?

नागपुरात स्थायी समिती कुणाकडे राहणार, याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. आता 24 फेबुवारीला बैठक होणार आहे. स्थायी समितीचे 16 सदस्य निवडले जातील. यातूनच अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने नागपुरात महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष असे महिलाराज राहणार असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. परिवहन समिती आणि इतर समित्यांवर कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता आहे. मनपा निवडणुकीचे निकाल लागून महिना उलटला आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेला विलंब होत असल्याने भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे.

निष्ठावंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्यानेच 151 सदस्यांच्या मनपात 102 सदस्यांचे बहुमत असताना सत्तारूढ भाजपमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीसोबतच मनपातील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. काँग््रेासने पराभूत उमेदवारांना संधी नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांचा स्वप्नभंग होणार आहे. दुसरीकडे भाजपकडील यादी मोठी आहे. प्रत्येक 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य करण्याच्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्याने अगदी कट्टर विरोधक असला, तरी कुणालाही सत्तेचा मोह टाळता येत नाही हे दिसत आहे. यातूनच भाजपच्या बॅनरवर काँग््रेासचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या फोटोची चर्चा उपराजधानीत रंगली.

नवीन नागपूरसाठी 676 हेक्टरवर मोजणी पूर्ण

नागपूर विभागाला 2047 पर्यंत देशात अग््रागण्य औद्योगिक व सेवा केंद्र म्हणून उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जाहीर केला. विकसित नागपूर 2047 शाश्वत विकास योजनेअंतर्गत तब्बल 5.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले. यातील 65 ते 75 टक्के निधी हा खासगी क्षेत्रातून उभारला जाणार आहे. नऊ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे. नवीन नागपूरसाठी 664 पैकी 603 हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले. 676 हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली. नागपूरसाठी ही सुवार्ता म्हणता येईल.

दरम्यान, राज्यात 1 जानेवारी ते 28 फेबुवारीपर्यंत कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या ग््राामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. नागपूर खंडपीठाने या प्रकरणावर 24 फेबुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT