ट्रम्प : कसे आहे वातावरण इंडियामध्ये? आपल्या चाळीस मिनिटांच्या कॉलचा बोलबाला झाला.
महामहीम : आता जरा घाईत आहे मी. नंतर बोलतो.
ट्रम्प : लिसन! मी बातम्या पहातोय. ते आरक्षण अँड ऑल सगळी गडबडी चालू आहे. राईट?
महामहीम : दक्षिणेतला मुद्दा मांडला उत्तर खवळली..
ट्रम्प : पश्चिमेस होर्मुझचा मुद्दा. नाही समजली महिला आरक्षण काय प्रकार आहे ते?
महामहीम : तात्या तुम्हाला इकडच्या सगळ्या बातम्या कशाला हव्या आहेत?
ट्रम्प : इराणशी चर्चा चालू नाही ना?
महामहीम : इकडे इराणी चहा प्यायचा सोडलाय तुमच्याशी मैत्री केल्यापासून. तुम्ही थेट इराणशी चर्चेबद्दल विचारले?
ट्रम्प : सॉरी. चौकशी तर मी सगळ्याच मित्र राष्ट्रांची करतो. तुम्ही का डिस्टर्ब आहे?
महामहीम : तुम्ही भारतावर जास्तच नजर ठेवून आहात. ते सर्व आपल्याला नाही समजणार. आंतरदेशीय मामला आहे. विरोधी नेते आमच्यावर जास्तच रुष्ट आहेत.
ट्रम्प : मी त्यात काही नाही करू शकत. इटली आधीच रुष्ट आहे आमच्यावर.
महामहीम : पाक आणि मेलोनीचा संदर्भ लागत आहे तुमच्या बोलण्यातून.
ट्रम्प : काहीही समजा. तुम्ही आणि तुमचे राजकारण माझ्याकडून ‘ऑल दी बेस्ट!’
महामहीम : मग, जरा शांत बसा. कीम आणि तुम्ही करा विचारपूस एकमेकांची. इकडे नका घुसत जाऊ जास्त. आमचे आम्ही बघू.
ट्रम्प : ओके! मी काय म्हणतो, मेलोड्रामा बस करा आणि इटलीशी माझा समझौता करून द्या. मेलोनी जाम फॅन आहे तुमची.
महामहीम : माझे सगळे फॅन आहेत. इटलीची माहेरवासीन विरोधी पक्षात असल्याने सगळे पक्ष माझ्यावर उलटले असं वाटत आहे.
ट्रम्प : मेड इन इटली म्हणा!
महामहीम : आमच्याकडे ती पक्ष चालवते.
ट्रम्प : अहो, आम्ही इटलीचा अपमान नाही करू शकत. तुम्ही पण नाही करायचा. उलट इटली आणि आमच्यात मध्यस्थीचे धोरण ठेवा. ते फायद्याचे आहे.
महामहीम : ओके. मेलोनीबद्दल जरा जास्तच मनाला लावून घेतलाय?
ट्रम्प : मरू दे ना. मला राजकारणाशी मतलब आहे. माझे मित्रराष्ट्र माझ्या पायी लढले पाहिजेत.
महामहीम : पायी राहणारे राष्ट्र एकच, पाकिस्तान. तुम्ही मध्यस्थी करा. आम्ही दक्षिणेची आणि उत्तरेची तूर्तास मोहीम सांभाळतो. जय हिंद!