cow urine fertilizer Pudhari
संपादकीय

cow urine fertilizer benefits |गोमूत्रयुक्त खताचा पर्याय

पुढारी वृत्तसेवा

शरयू माने

युद्धामुळे रासायनिक खतांच्या किंमतीत 30 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अशा काळात गोमूत्रयुक्त खताचा वापर शेतकर्‍यांसाठी एक उत्तम पर्याय आणि उपाय पुढे आला आहे.

आखाती युद्धामुळे देशाच्या आयात आणि निर्यात यावर प्रभाव पडत असून अनेक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. खतांच्या विक्रीवर परिणाम झालेलाच आहे. इराण हा रासायनिक खतांचा मोठा उत्पादक देश आहे. युद्धामुळे अजूनही खतांच्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियाशी भारताचा होणारा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होतो. भारताचा व्यापार त्यामुळे विस्कळीत झाला. कोरोनाकाळात खत तुटवड्यामुळे गोमुत्रापासून खतं तयार केली जाऊ लागली. शेतकर्‍यांचे उत्पन्न त्यातून चालू झाले. गोमुत्रापासूनच्या खतांचा उपयोग शेतकर्‍यांना फायद्याचा ठरला. त्यावेळी त्याच्या मागणीने पुरवठा नियंत्रणावर शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले. पूर्वी गोमूत्र हा विषय निव्वळ धार्मिक आसक्तीचा आणि तेवढ्याच पुरता मर्यादित होता. हल्ली त्यावर संशोधनं होऊन व्यावसायिक रूप मिळालेले दिसून येते.

हे शेतकर्‍यांचे नवे उत्पादनांचे तंत्र योजनाबद्ध पद्धतीने व्यवसायात रूपांतरित करण्यात यश प्राप्त झालं; पण देशी गायींचे संवर्धन इथपासून ते त्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती आणि स्वच्छता या गोष्टी कसोशीने पाळून गोमूत्र संकलन केले जाते. गायीचे दूध आणि उपपदार्थ तर सर्वांना ठाऊक आहेत; पण गोमूत्र संकलन करून काय करता येईल, यावर सविस्तर विचार झाला कोरोनाच्या प्रभावामुळे. या काळात खतांची आणि शेतमालाची आयात थांबली. निर्यात बंद झाली. देशांतर्गत या बाबींवर तोडगा काढणे तातडीचे होते. त्यामुळे गोमुत्रापासून खतनिर्मिती कशी करता येईल, यावर ठोस विचारप्रणाली राबविण्यात आली. तांत्रिक सल्लामसलत झाली. निर्णयांती संकल्पना सत्यात अवतरली. गोमुत्राचा वापर शेतीसाठी व्हावा, कारण त्यात अनेक कीटकनाशकांचा गुणधर्म असणारे तत्त्व मोठ्या प्रमाणात असते का, यावर अभ्यास झाला. परिणामस्वरूप सकारात्मकतेकडे वळत शेतकर्‍यांना गोमूत्र संकलनाचे नवे स्रोत सापडले.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने स्टार्टअप्स कंपनीअंतर्गत रोजगाराचे हे नवीन साधन शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेे. या प्रकल्पाचे संचालक गुजारातमधील सामान्य शेतकरी असून 1200 शेतकरी कुटुंबांना या योजनेचे लाभार्थी होण्यास सहायक ठरले. 2017 मध्ये हे शेतकरी प्रतिदिन 50 लिटर इतके गोमूत्र संकलन करण्यात यशस्वी ठरले. आता ते प्रतिदिन 6000 लिटर इतके गोमूत्र संकलन करत आहेत. गोमूत्र संकलनानंतर त्यापासून आणखी तीन उपपदार्थ तयार केले जातात. यामुळे वार्षिक उत्पन्नात वाढ होत आहे. हे गोमूत्र प्रतिलिटर 5 रुपये दराने खरेदी केले जाते. गोमुत्रातून 50 टक्के पाणी वेगळे करून उर्वरित अमोनियम रिच 30 टक्के वेगळे करण्यात येते. उर्वरित 20 टक्के पोटॅश राहते. या पदार्थात झाडपाला टाकून 3 लिक्वीड उत्पादने तयार होतात. त्यापैकी एक सॉईल कंडिशनर हे उत्पादन जमीन भुसभुशीत बनविण्यास मदत करते. पिकांना मुळाची वाढ लवकर होण्यास मदत होते. पानाफळांवर स्प्रे करता येतो. तिसरे कीड नियंत्रणासाठी असून त्यात पेस्टे टेम्प्लेटचा समावेश आहे. या बायप्रॉडक्टमुळे शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न 90 लाखांपासून एक कोटींपर्यंत पोहोचले .

आता सांगायचा मथितार्थ म्हणजे शेतकर्‍यांची खतांवाचून होणारी परवड थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं अवलंबणे तातडीचे बनले. पूर्वग्रह आणि गोमुत्राचा पारंपरिक वापर वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून, एकच पर्याय न राहता वेगवेगळ्या कारणांसाठी कसा वापर होईल, हे गणित समजणे आवश्यक झाले. पूर्वी ब्रिटनचे डॉक्टर काफोड हेमिलटन यांनी बहुउपयोगी गोमूत्र यावर भाष्य केलेले आहे. हृदयरोग, अस्थमा, किडनी रोग यावर गोमूत्र प्रभावशाली मानले गेले. हे खूप जुने औषध आहे. सिमर्स या चिकित्सकाने सांगितले आहे की, यामुळे रक्तातील दूषित घटक नष्ट होतात. आयुर्वेदाने वर्णित केल्याप्रमाणे गोमूत्र कुष्ठरोगावर नियंत्रण करते. अस्थमा, सोरायसिस, किडनी विकार, अ‍ॅनिमिया, कॅन्सर बरा करते. गोमुत्रामध्ये कॅल्शियम, पोटॅशियमसोबत घातक पदार्थ पण समाविष्ट असतात. युरिया, क्रियेटीन हे हानिकारक घटक खतनिर्मितीत वापरतात. हे आढळून आल्यावर त्याचा खतनिर्मितीत उपयोगासाठी हल्ली वापर केला जाऊ लागला. त्यामुळे शुद्धता नसलेले गोमूत्र हे कीटकनाशकांचे काम करते, हे ध्यानात असू द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT