पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर-३ फेम सलमान खानची इफ्फीत चर्चा रंगली. इफ्फी महोत्सवाला सलमानने हजेरी लावली. तो ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी गोवा पोहोचला. (Salman Khan IFFI) येथे तो आपल्या भाची अलिजेह अग्निहोत्रीच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आला. कार्यक्रमाच्या एंट्री दरम्यान सलमान खानने भरगर्दीत अचानक एका महिलेला किस केले. (Salman Khan IFFI)
इफ्फीच्या कार्यक्रमात सलमान खानला पाहून प्रचंड गर्दी झाली. यावेळी नकळतपणे सलमान एका महिलेकडे गेला आणि तिला अचानकपणे किस केलं. IFFI 2023 मधील हा किसींग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानने ५४ व्या इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात ग्रँड एन्ट्री केली. तो भाची अलिजेह अग्निहोत्रीसोबत पोहोचला. चित्रपट फर्रे सोबत अलिजेह अग्निहोत्री बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.
सलमान खानने ज्या महिलेला किस केलं, ती एक सीनियर जर्नलिस्ट आहे आणि सलमानची चांगली मैत्रीणदेखील आहे.