salman khan 
Latest

सलमान खानची मोठी घोषणा, ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेता सलमान खानच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक 'बजरंगी भाईजान' आहे. चित्रपटाच्या कहाणी ते गाण्यांपर्यंत फॅन्सच्या पसंतीस उतरले होते. आता सलमान खानने बजरंगी भाईजानचा सीक्वल येणार असल्याची मोठी घोषणा केलीय. या वृत्तानंतर सोशल मीडियावर Bajrangi Bhaijaan 2 ट्रेंडवर आला आहे.

सलमान खानने 'बजरंगी भाईजान' 2 ( Bajrangi Bhaijaan 2) चित्रपटाची घोषणा रविवारी मुंबईमध्ये आरआरआर चित्रपटाच्या एका कार्यक्रमात केली. या औचित्याने आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि करण जोहर उपस्थित होता.

एका रिपोर्टनुसार, करण जोहरने सलमान खानला विचारलं की, आम्ही ही अधिकृत घोषणा आहे, असे समजू का? यावर सलमान खानने उत्तर दिलं की, 'हो, करण.'

बजरंगी भाईजान

आधीच्या बजरंगी भाईजान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. 'बजरंगी भाईजान' २०१५ मध्ये रिलीज झाला होता. कबीर खान दिग्दर्शित चित्रपटात सलमान खान, करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं. या चित्रपटात हर्षाली मल्होत्राने एका पाकिस्तानच्या 'मुन्नी' या मुलीची भूमिका साकारली होती.

RRR चित्रपटाच्या एका कार्यक्रमात बॉलिवूड आणि साऊथ कलाकारांनी हजेरी लावली

सलमान खान आता दिल्लीमध्ये कॅटरीना कैफसोबत चित्रपट 'टायगर-३' चे शूटिंग करणार आहे. सलमानकडे आणखी एक 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट आहे. पण, अधिकृतरित्या त्याने या चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT